शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सेफ्टिक टँकमध्ये श्वास गुदमरून चार सफाई कर्मचाऱ्यांसह सात जणांचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2019 17:05 IST

गुजरातमधल्या बडोदा जिल्ह्यात एका हॉटेलमधील सेफ्टिक टँक साफ करत असताना घुसमटून चार सफाई कर्मचाऱ्यांसह सात जणांचा मृत्यू झाला आहे.

बडोदाः गुजरातमधल्या बडोदा जिल्ह्यात एका हॉटेलमधील सेफ्टिक टँक साफ करत असताना घुसमटून चार सफाई कर्मचाऱ्यांसह सात जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेची नोंद दभोई पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली असून, पोलीस कर्मचारी, अँब्युलन्स आणि फायर ब्रिगेडचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले आहेत. बचावकार्य राबवण्यात आलं असून, तक्रारही नोंदवण्यात आली आहे.बडोदा शहरापासून जवळपास 30 किलोमीटर अंतरावर असलेल्या दभोई तहसीलच्या फर्तिकुई गावातल्या एका हॉटेलमध्ये ही घटना घडली. हॉटेलमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये तीन कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. दभोई तालुक्यातील थुववी गावातील चार जण सेफ्टिक टँक साफ करण्यासाठी टाकीमध्ये उतरले होते.जेव्हा एक सफाई कर्मचारी मॅनहोलमधून बाहेर आला नाही, तर इतर जण त्याला पाहण्यासाठी टाकीत उतरले आणि सगळ्यांचा श्वास गुदमरून मृत्यू झाला. या दुर्घटनेत हितेश हरिजन (23), त्यांचे वडील अशोक हरिजन (45), महेश हरिजन (25), महेश पन्नवाडिया (46), विजय चौधरी (22), शाहदेव वसावा(22) आणि एकाचं नाव अजय असं आहे. या घटनेनं दभोई परिसरावर शोककळा पसरली आहे. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.