शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

माजी खासदार सोळंकीसह सात जणांना जन्मठेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2019 05:03 IST

आरटीआय कार्यकर्त्याच्या हत्येचे प्रकरण

अहमदाबाद : माहिती अधिकार कार्यकर्ते अमित जेठवा यांच्या हत्येप्रकरणी भाजपचे माजी खासदार दिनू बोघा सोळंकी आणि सहा अन्य जणांना सीबीआयच्या विशेष न्यायालयाने गुरुवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

अमित जेठवा यांची २०१० मध्ये हत्या करण्यात आली होती. गिर वन क्षेत्रात अवैध खनन होत असल्याचा पर्दाफाश करण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता. विशेष सीबीआयचे न्यायाधीश के. एम. दवे यांनी सोळंकी आणि त्यांचा पुतण्या यांना १५-१५ लाख रुपये दंडही आकारला आहे. त्यांचा पुतण्याही या प्रकरणात आरोपी आहे. न्यायालयाने निर्णय देताना सोळंकी आणि त्यांचा पुतण्या शिवा सोळंकी याला हत्या आणि कट रचणे या प्रकरणात दोषी ठरविले. सोळंकी हे २००९ ते २०१४ या काळात जुनागडचे खासदार होते. या प्रकरणात अन्य दोषींमध्ये शैलेश पांड्या, बहादूरसिंह वढेर, पंचनजी देसाई, संजय चौहान आणि उदाजी ठाकोर यांचा समावेश आहे.काय आहे प्रकरण?वकील असलेल्या अमित जेठवा यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. त्यांनी २०१० मध्ये गिर अभयारण्य आणि आजूबाजूच्या अवैध खननाबद्दल जनहित याचिका दाखल केली होती.सोळंकी आणि त्यांच्या पुतण्याला या प्रकरणात प्रतिवादी बनविण्यात आले होते. जेठवा यांनी या प्रकरणात अनेक कागदपत्रे सादर केले होते.या याचिकेच्या सुनावणीदरम्यान जेठवा यांची २० जुलै २०१० रोजी गुजरात उच्च न्यायालयाच्या बाहेर गोळी मारून हत्या करण्यात आली होती.सुरुवातीला अहमदाबाद पोलिसांच्या गुन्हे शाखेने तपास करून दिनू सोळंकी यांना क्लीन चिट दिली होती. तपासावर असमाधान व्यक्त करीत उच्च न्यायालयाने २०१३ मध्ये प्रकरण सीबीआयकडे सोपविले होते.