शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

१ जिल्हा, २४ तास अन् ७ आत्महत्या; सर्व आत्महत्यांमध्ये एक समान धागा; पोलीसही चक्रावले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2021 19:08 IST

आत्महत्या करणाऱ्यांमध्ये विविध वयोगटांमधल्या व्यक्तींचा समावेश; पोलिसांकडून तपास सुरू

नोएडा: दिल्लीला लागून असलेल्या उत्तर प्रदेशातल्या नोएडा जिल्ह्यात २४ तासांत ७ जणांनी आत्महत्या केल्या आहेत. यामध्ये एका सॉफ्टवेअर अभियंत्याचादेखील समावेश आहे. या घटनांमुळे पोलिसांना धक्का बसला आहे. पोलिसांनी सगळ्या प्रकरणांचा तपास सुरू केला आहे. सात आत्महत्यांपैकी बऱ्याचशा प्रकरणांमध्ये पोलिसांनी ताण तणावाची शक्यता वर्तवली  आहे. तशी माहिती चौकशीतून समोर आली आहे.पोलीस अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, सेक्टर-३९ पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या अजनारा हेरिटेज सोसायटीत वास्तव्यास असलेले सॉफ्टवेअर अभियंता तबरेज खान (वय ४५ वर्षे) मंगळवारी त्याच्या राहत्या घरी आत्महत्या केली. पंख्याला गळफास लावून त्यांनी जीवन संपवलं. खान गुरुग्राममधील एका कंपनीत काम करत होते. काही दिवसांपूर्वीच त्यांचा एक प्रकल्प नाकारला गेला होता. त्यामुळे त्यांना नैराश्य आलं होतं.भरधाव कारची धडक; पादचारी १०० फूट दूर जाऊन पडला; अंगावर काटा आणणारा VIDEOएल्डिको आमंत्रण सोसायटीत तरुणीची आत्महत्यासेक्टर ११९ मध्ये असलेल्या एल्डिको आमंत्रण सोसायटीत राहात असलेल्या २० वर्षीय तरुणीनंदेखील पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. पार्थवी चंद्रा असं तिचं आवाज होतं. पार्थवीला कुटुंबीयांनी रुग्णालयात दाखल केलं. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. पोलिसांकडून सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे.वाजिदपूर महिलेची गळफास घेऊन आत्महत्यावाजिदपूर गावात राहणाऱ्या गीता देवी (वय ४० वर्षे) यांनी सोमवारी रात्री पंख्याला गळफास लावून जीवन संपवलं. या घटनेची माहिती मिळताच पोलीस तिथे दाखल झाले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनासाठी पाठवला.दादरी क्षेत्रातल्या लोहारलीमध्ये तरुणाची आत्महत्यादादरी परिसरातल्या लोहारली गावात राहत असलेल्या भीम (वय २८ वर्ष) यांनीदेखील आत्महत्या केला. तर सेक्टर ४९ मधील बरौला गावात राहणाऱ्या धर्मेंद्र (वय ४० वर्ष) यांनी मानसिक तणावाला कंटाळून पंख्याला गळफास लावून जीवन प्रवास संपवला.सेक्टर ४९ मध्ये तणावाला कंटाळून तरुणाची आत्महत्यापोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सेक्टर-२० मध्ये प्रकाश हलदर (वय ३० वर्ष) या तरुणानंदेखील आत्महत्या केली. पंख्याला लटकून त्यानं स्वत:ला संपवलं. तर सेक्टर ४९ मध्ये वास्तव्यास असलेल्या एका व्यक्तीनं नैराश्याला कंटाळून टोकाचं पाऊल उचललं.