शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
3
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
4
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
5
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
6
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
7
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
8
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
9
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
10
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
11
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
12
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
13
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
14
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
15
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
16
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
17
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
18
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
19
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
20
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द

छत्तीसगढमधील चकमकीत सात नक्षलवाद्यांचा खात्मा; घटनास्थळावरून शस्त्रास्त्रे, स्फोटकांचा मोठा साठा जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2019 01:02 IST

घटनास्थळी इन्सास रायफल, ३0३ रायफल, १२ बोअरची भरमार बंदूक, बॅनर, पोस्टर, औषधी, स्फोटके, डिटोनेटर, विजेच्या तारा, बॅटरी आणि दैनंदिन उपयोगाची सामग्री मिळाली आहे.

- सुधीर जैनजगदलपूर : नक्षली शहीद सप्ताहाच्या एक दिवस आधी छत्तीसगढमधील जगदलपूर जिल्ह्णात शनिवारी सायंकाळी पोलीस आणि नक्षलवादी यांच्यात भीषण चकमक झडली. यात सात गणवेशधारी नक्षलवादी मारले गेले. घटनास्थळावरून नक्षलवाद्यांच्या मृतदेहांसह स्फोटकांचा मोठा साठा जप्त करण्यात आला.बस्तरचे पोलीस महानिरीक्षक विवेकानंद सिन्हा यांनी सांगितले की, नक्षली शहीद सप्ताहात मोठ्या कारवाईच्या तयारीसाठी नक्षलवादी ओडिशा सीमेवरील तिरिया गावाच्या जंगलात गोळा झाले आहेत. ही माहिती मिळताच नगरनार पोलीस ठाण्यातून एसटीएफ, डीआरजी आणि डीएफ यांचे एक संयुक्त पथक शोध मोहिमेवर रवाना झाले. पोलिसांची चाहूल लागताच नक्षलवाद्यांनी गोळीबार सुरू केला. पोलिसांनी तोडीस तोड उत्तर दिले. सुमारे तासभर चाललेल्या चकमकीनंतर नक्षलवादी जंगल आणि पहाडाचा आडोसा घेऊन पसार झाले.घटनास्थळावर सात मृतदेह सापडले आहेत, तसेच रक्ताचे डाग व ओढल्याच्या खुणा पाहता आणखी ५ ते ६ नक्षलवादी मारले गेले असावेत, अथवा जखमी झाले असावेत, असे दिसते. हे मृतदेह नक्षलवादी सोबत घेऊन गेले असावेत.हाती आलेल्या मृतदेहांची ओळख पटविली जात आहे. घटनास्थळी इन्सास रायफल, ३0३ रायफल, १२ बोअरची भरमार बंदूक, बॅनर, पोस्टर, औषधी, स्फोटके, डिटोनेटर, विजेच्या तारा, बॅटरी आणि दैनंदिन उपयोगाची सामग्री मिळाली आहे.

टॅग्स :naxaliteनक्षलवादी