शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या आवारात आणखी सात मंदिर बांधणार! मंदिराचे काम कधी पूर्ण होणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2024 20:11 IST

रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी मंदिराबाबत माहिती दिली आहे.

अयोध्येतील राम मंदिरात उद्या प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे. सोहळ्यापूर्वी संपूर्ण देश राममय झाला आहे. प्राणप्रतिष्ठेपूर्वीची तयारी पूर्ण झाली असून आता रामलला त्यांच्या भव्य मंदिरात कधी विराजमान होणार या क्षणाची देश वाट पाहत आहे. दरम्यान, श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट आणि मंदिर बांधकाम समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी मंदिर बांधकामाबाबत माहिती दिली.  त्यांनी सांगितले की, मंदिराचे बांधकाम डिसेंबर २०२४ पर्यंत पूर्ण होईल.

नृपेंद्र मिश्रा म्हणाले, २३ जानेवारीपासून पुन्हा नव्या उत्साहाने आणि बांधिलकीने कामाला सुरुवात होईल, जेणेकरून मंदिराचे बांधकाम २०२४ मध्येच पूर्ण होईल. प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमानंतर पुन्हा कामाला सुरुवात होईल. सोमवारी दुपारी १२.३० वाजता रामललाच्या प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठेपूर्वीच व्यवसायात तेजी! आतापर्यंत एक लाख कोटींचा बिझनेस

मिश्रा म्हणाले की, राम मंदिर परिसरात आणखी सात मंदिरे बांधली जातील. ही मंदिरे सामाजिक समरसतेचे प्रतिक असतील. अभिषेक झाल्यानंतर त्यांचे बांधकाम सुरू होईल.

२.७ एकर जागेवर नगारा शैलीत राम मंदिर बांधण्यात आले आहे. हे तीन मजली मंदिर आहे त्याची लांबी ३८० फूट (पूर्व ते पश्चिम) आणि २५० फूट रुंदी आहे. याशिवाय मंदिराची उंची  १६१ फूट आहे. या मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे आहेत. याशिवाय मंदिरात नृत्य मंडप, रंगमंडप, सभा मंडप, प्रार्थना मंडप आणि कीर्तन मंडप असे पाच मंडप आहेत.

प्राणप्रतिष्ठेच्या विधीत डोमराजांच्या कुटुंबासह विविध विभागातील १४ जण सहभागी होणार आहेत. १६ जानेवारीलाच प्राणप्रतिष्ठेचा विधी सुरू झाला होता. यजमानांच्या यादीत उदयपूरचे रामचंद्र खराडी, आसामचे राम कुई जेमी, जयपूरचे गुरुचरण सिंग गिल, मुलतानीचे रमेश जैन, तामिळनाडूचे अलरासन आणि महाराष्ट्राचे विठ्ठल राव कमनेले यांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील महादेवराव गायकवाड. लखनौ येथील दिलीप वाल्मिकी, डोमराजाच्या कुटुंबातील अनिल चौधरी आणि काशी येथील कैलाश यादव यांचा समावेश करण्यात आला आहे.

टॅग्स :Ayodhyaअयोध्याRam Mandirराम मंदिर