शहरं
Join us  
Trending Stories
1
जिल्हा परिषद सर्कल आरक्षण रोटेशनला आव्हान देणाऱ्यांना झटका, उच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्या
2
धगधगतं फ्रान्स! लाखो लोक रस्त्यावर उतरले, काही ठिकाणी दगडफेक; रेल्वे, मेट्रो, बस, शाळा बंद
3
सौदी अरेबियानं लढवली शक्कल, पाकिस्तानला कळलंच नाही; 'डिफेन्स डील'मागची Inside Story काय?
4
आजीच्या जिद्दीला सलाम ! ७१ वर्षांच्या महिलेने चक्क १३,००० फूटांवरून केलं 'स्कायडायव्हिंग'
5
'१-२ जागा कमी जास्त चालतील, पण...', बिहार निवडणुकीबाबत चिराग पासवान यांचे मोठे वक्तव्य
6
भूषण प्रधान आणि केतकीने लग्नाआधीच दिली गुडन्यूज? अभिनेत्याच्या पोस्टने चर्चेला उधाण
7
Video - "मी मुस्लिम, पण मला हा रंग आवडतो"; 'भगवा आयफोन' खरेदी केल्याचा प्रचंड आनंद
8
खळबळजनक! गोड बोलला, खांद्यावर हात ठेवला अन् गळा चिरला; नवऱ्याचा बायकोवर जीवघेणा हल्ला
9
काकासोबत असलेल्या प्रशिकवर बिबट्याची झडप, घरापासून ५० मीटरवर सापडला मृतदेह
10
iPhone 17: बीकेसीतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर तुफान राडा; सुरक्षारक्षकालाही धक्काबुक्की!
11
‘२०१४ पासून मराठा समाजाला देण्यात आलेल्या कुणबी जात प्रमाणपत्रांची माहिती उपलब्ध करून द्या’, काँग्रेसची मागणी 
12
रेपचा व्हिडिओ, पत्नीची आयडिया; पती विधवा महिलांसोबत बनवायचा संबंध, आरोपीचा खळबळजनक खुलासा
13
अजबच! फ्रेंड रिक्वेस्ट रिजेक्ट केल्याने तरुणी संतापली, अपहरण करून तरुणाला मारहाण केली, त्यानंतर...
14
श्रद्धा कपूरने दिली प्रेमाची कबुली, शेअर केला मजेशीर व्हिडिओ; बॉयफ्रेंडला टॅग करुन म्हणाली...
15
"फडणवीस साहेबांनी मला बोलावलं अन्...", समीर चौघुलेंनी सांगितला विमानातला किस्सा; म्हणाले...
16
हॉर्लिक्स, विक्स, झंडू बाम, डायपर, टुथपेस्ट... सर्वकाही स्वस्त; दिग्गज कंपन्यांनी जारी केली नवी लिस्ट
17
"एकटं वाटलं की मी सिद्धिविनायक मंदिरात जाऊन बसते...", रिंकूने सांगितलं कारण, म्हणाली...
18
Mumbai Crime: घाटकोपर रेल्वे स्थानकाबाहेर सापडला ३५ वर्षाच्या माणसाचा मृतदेह; कोणामुळे गेला जीव?
19
‘टॅरिफ’मुळे प्लास्टिक उद्योग अडचणीत; ३ वर्षांत भारतातून इतर देशांमध्ये चौपटीने निर्यात वाढविण्याचे लक्ष्य
20
शेअर बाजाराच्या तेजीला ब्रेक; Sensex १४७ अंकांनी आपटला, निफ्टीतही घसरण; 'हे' प्रमुख स्टॉक्स घसरले

जेटलींंसह सात मंत्र्यांना राज्यसभेची उमेदवारी, १८ जणांबाबत निर्णय नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2018 01:51 IST

सात केंद्रीय मंत्री व पक्षाचे सरचिटणीस यांना भाजपने राज्यसभेची पुन्हा उमेदवारी दिली आहे. अठरा उमेदवारांबाबतचा निर्णय अद्याप झालेला नाही. राज्यसभेच्या २६ ते २७ जागा भाजपा जिंकू शकेल. दोन दिवसांत इतर नावे जाहीर केली जातील. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांना महाराष्ट्रातूनच राज्यसभेवर पाठविण्यात येणार आहे.

- हरिश गुप्तानवी दिल्ली - सात केंद्रीय मंत्री व पक्षाचे सरचिटणीस यांना भाजपने राज्यसभेची पुन्हा उमेदवारी दिली आहे. अठरा उमेदवारांबाबतचा निर्णय अद्याप झालेला नाही. राज्यसभेच्या २६ ते २७ जागा भाजपा जिंकू शकेल. दोन दिवसांत इतर नावे जाहीर केली जातील. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांना महाराष्ट्रातूनच राज्यसभेवर पाठविण्यात येणार आहे.अरुण जेटली, रविशंकर प्रसाद, जे. पी. नड्डा, धर्मेंद्र प्रधान, थावरचंद गहलोत या केंद्रीय मंत्र्यांना तसेच पुरुषोत्तम रुपाला व मनसुख मांडवीय या दोन राज्यमंत्र्यांना उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सांगण्यात आले आहे. भूपेंद्र यादव राजस्थानमधून निवडणूक लढवतील. केंद्रीय मंत्र्यांना पुन्हा उमेदवारी मिळेल, हे वृत्त लोकमतने २५ फेब्रुवारी रोजीच दिले होते. जेटली यांना गुजरातऐवजी उत्तर प्रदेशातून तर धर्मेंद्र प्रधान यांना बिहारऐवजी मध्य प्रदेशमधून रिंगणात उतरवले आहे. रविशंकर प्रसाद बिहारमधून व थावरचंद गहलोत यांना मध्य प्रदेशमधूनच उमेदवारी मिळाली आहे. जे. पी. नड्डा हिमाचल प्रदेशातूनच रिंगणात असतील.समाजवादी पक्षातर्फे जया बच्चननवी दिल्ली : उत्तर प्रदेशातल्या राज्यसभेच्या जागेसाठी समाजवादी पक्षातर्फे जया बच्चन यांना पुन्हा उमेदवारी देण्याचे निश्चित झाले आहे. यामुळे सपाचे नरेश अग्रवाल यांना संसदेत परतण्यासाठी प्रतीक्षा करावी लागेल. बच्चन यांना पक्षाने तिसºयांदा उमेदवारी दिली आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि जया बच्चन यांची निकटता हा मध्यंतरी चर्चेचा विषय होता. तृणमूलने जया बच्चनना प.बंगालमधून उमेदवारी देण्याची तयारी दर्शविली होती.यांच्याबाबत अद्याप निर्णय नाहीउमेदवारांच्या नावांची एकाच वेळी घोषणा करण्याचे भाजपा टाळत आहे. सरचिटणीस राम माधव, मुरलीधर राव, अरुण सिंग, अनिल जैन आदींना उमेदवारी द्यायची की नाही, याचा भाजपाने अद्याप निर्णय घेतलेला नाही.

टॅग्स :ElectionनिवडणूकRajya Sabhaराज्यसभाArun Jaitleyअरूण जेटलीBJPभाजपा