शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

कर्ज बुडवून सात लाख कंपन्या भुर्रर्र...! अजून सुरू आहेत कर्जवसुलीचे खटले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2023 07:27 IST

Money: देशातील सुमारे ७ लाख कंपन्यांविरोधात कर्जवसुलीसाठी सरफेसी कायद्यान्वये खटले सुरू असून, यातील बहुतांश कंपन्या बंद पडल्या आहेत, अशी माहिती हाती आली आहे. 

- हरीश गुप्ता नवी दिल्ली : देशातील सुमारे ७ लाख कंपन्यांविरोधात कर्जवसुलीसाठी सरफेसी कायद्यान्वये खटले सुरू असून, यातील बहुतांश कंपन्या बंद पडल्या आहेत, अशी माहिती हाती आली आहे. ऋण वसुली प्राधिकरणामध्ये (डीआरटी) २०१६-१७ ते २०२०-२१ या कालावधीत एकूण ६.८८ लाख कंपन्यांविरोधात कर्जवसुलीचे खटले दाखल झाले आहेत. यापैकी किती कंपन्यांनी व्यवसाय बंद केला आहे, याची अधिकृत आकडेवारी कंपनी व्यवहार मंत्रालयाकडे उपलब्ध नाही. तथापि, अधिकृत सूत्रांनी सांगितले की, यातील बहुतांश कंपन्या एक तर दिवाळखोर झाल्या आहेत किंवा गायब झाल्या आहेत. 

मोदी सरकारने २०१६ मध्ये सरफेसी कायद्यात सुधारणा केल्या. त्यानंतरची ही आकडेवारी...वर्ष          कर्जवसुली खटले२०१६-१७    १,९९,३५२२०१७-१८    ९१,३३०२०१८-१९    २,३५,४३७२०१९-२०    १,०५,५२३२०२०-२१    ५७,३३१     (हंगामी)

६,८८,९७३ कंपन्यांविरोधात कर्जवसुलीचे  खटले दाखल

कायदा आणखी कडकबँका व वित्तीय संस्था १ लाख रुपयांपेक्षा अधिकचे थकीत कर्ज सरफेसी कायदा २००२ च्या तरतुदीनुसार वसूल करू शकतात. २०१६ मध्ये हा कायदा आणखी कडक करण्यात आला. थकीत कर्जासाठी तारण मालमत्ता ताब्यात घेण्याचा अधिकार कर्जदाता संस्थांना त्याद्वारे देण्यात आला.  जिल्हाधिकाऱ्यांच्या मदतीने ही कारवाई करता येते. त्यासाठी न्यायालये अथवा लवादाच्या हस्तक्षेपाची गरज नाही. सरफेसी कायद्याच्या कठोर तरतुदी मवाळ करण्याची मागणी सरकारकडे सातत्याने केली जात आहे. तथापि, ती मान्य झालेली नाही.

टॅग्स :MONEYपैसाBanking Sectorबँकिंग क्षेत्र