शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई, पुण्यासह सात शहरांतील घरांच्या आकारमानात २७ टक्के घट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2019 07:07 IST

देशातील आर्थिक मंदीच्या वातावरणाचा गृहबांधणी क्षेत्रावरही मोठा परिणाम

नवी दिल्ली : मुंबई, पुणे, दिल्ली, बंगळुरू, चेन्नई, कोलकाता, हैदराबाद या सात शहरांतील घरांचे सरासरी आकारमान गेल्या पाच वर्षांत २७ टक्क्यांनी घटल्याचे अ‍ॅनारॉक या स्थावर मालमत्ताविषयक सल्लागार संस्थेने आपल्या अहवालात म्हटले आहे. देशातील आर्थिक मंदीच्या वातावरणाचा गृहबांधणी क्षेत्रावरही मोठा परिणाम झाला आहे.या सात शहरांमध्ये २०१४ साली घरांचे सरासरी आकारमान १,४०० चौरस फुट होते. यंदाच्या वर्षी हे प्रमाण १०२० चौरस फुट इतके खाली घसरले आहे. मुंबईतील घरांचे सरासरी आकारमान सर्वात कमी आहे. मुंबईत २०१४ साली घरांचे सरासरी आकारमान ९६० चौरस फुट इतके होते. त्यात सुमारे ४५ टक्के इतकी घसरण होऊन ते प्रमाण यंदा ५३० चौरस फुटांपर्यंत आले आहे. पुण्यामध्येही ३८ टक्के घसरण होऊन तेथील घरांचे सरासरी आकारमान ६०० चौ. फु. झाले आहे.अनॅरॉकच्या अहवालात म्हटले आहे की, गेल्या काही वर्षांत कमी मागणी असल्याने घरांच्या किंमतीतही फार वाढ झालेली नाही. त्यामुळे विकासकांनी लहान आकारमानाची घरे बांधण्यास प्राधान्य दिले आहे. देशात सध्या आलेल्या आर्थिक मंदीमुळे स्थावर मालमत्ता तसेच गृहनिर्माण क्षेत्राची स्थिती आणखीन बिकट झाली आहे. चेन्नई, बंगळुरू, हैदराबाद येथील घरांचे सरासरी आकारमान गेल्या पाच वर्षांत अनुक्रमे ८ टक्के, ९ टक्के व १२ टक्क्यांनी घटले आहे. कोलकातामध्ये सरासरी आकारमानात ९ टक्के घसरण होऊन ते आता १,१२० चौरस फुट झाले आहे.देशातील नागरिकांना परवडणारी घरे उपलब्ध करून देण्यासाठी ४५ लाख रुपयांपर्यंतच्या घरांना सरकारने कमी जीएसटी आकारला आहे तसेच कर्जासंदर्भात काही सवलती दिल्या आहेत. त्याचाही गृहनिर्माण क्षेत्रावर परिणाम झाला आहे.