नवी दिल्ली: हैदराबाद, उन्नाव या घटनांसारखेच देशातील अनेक भागात महिलांवरील अत्याचार वाढत चालले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर कायदा आणखी कठोर करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. मोदी सरकारनंही या प्रकरणांची दखल घेतली असून, बलात्काराशी संबंधित प्रकरणांचा दोन महिन्यांत निपटारा करण्याची शिफारस राज्य सरकार आणि उच्च न्यायालयांना करण्यात येणार आहे. महिलांवरील बलात्कारांच्या घटनांची चौकशी दोन महिन्यांत पूर्ण करण्यासाठी सर्व राज्यांचे मुख्यमंत्री आणि उच्च न्यायालयांच्या मुख्य न्यायाधीशांना पत्र लिहिणार असल्याचं केंद्रीय कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी सांगितलं आहे. प्रसारमाध्यमांशी चर्चा करताना ते बोलत होते.
बलात्काराशी संबंधित प्रकरणांचा दोन महिन्यांत निपटारा करा, मोदी सरकारची शिफारस
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2019 21:47 IST