शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

सिरमची 'मोठी' घोषणा; २०२१ मध्ये पाच वेगवेगळ्या कोरोना लसींच्या १०० कोटी डोसची निर्मिती करणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2020 17:19 IST

सिरम इन्स्टिट्यूट २०२१ मध्ये दर तीन महिन्याला एक लस उपलब्ध करून देणार आहे.

पुणे : सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि ब्रिटीश-स्वीडिश कंपनी अ‍ॅस्ट्राजेनेकासह कोरोना लसची निर्मिती करत आहे. या कोरोना लसीकडे भारतासह संपूर्ण जगाचे लक्ष लागून आहे.साधारण डिसेंबर ते मार्च या दरम्यान ही लस बाजारात उपलब्ध होण्याची शक्यता आहे. मात्र सिरम इन्स्टिटयूट कडून पुन्हा एकदा कोरोना लसीविषयीची मोठी घोषणा करण्यात आली आहे.

'सिरम' चे सीईओ आदर पूनावाला यांनी २०२१ मध्ये पाच वेगवेगळ्या कोरोना लसींचे १०० कोटी डोसची निर्मिती करणार असल्याची माहिती दिली आहे. कोव्हिशिल्ड , कोवोवॅक्स, कोविववॅक्स  कोवीवॅक, एसआआय कोवॅक्स असे या लसींचे नावे आहेत  साधारण २०२२ च्या पूर्वीच हे डोस तयार करण्याचा प्रयत्न आहे अशी ही माहिती पूनावाला यांनी 'इंडिया टुडे' ला दिली आहे. कोव्हिशिल्ड , कोवोवॅक्स, कोविववॅक्स  कोवीवॅक, एसआआय कोवॅक्स असे या लशींचे नावे आहेत. 

पूनावाला म्हणाले, सिरम इन्स्टिट्यूट “कोव्हिशिल्ड या लसीपासून सुरुवात करणार असून पुढील वर्षी अर्थात २०२१ मध्ये  दर तीन महिन्याला एक लस उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. कोव्हिशिल्ड या युकेमधील ऑक्सफर्ड विद्यापीठाकडून विकसित करण्यात आलेल्या लसीची वैद्यकीय चाचणीचा तिसरा टप्पा सध्या भारतात सुरु आहे. १६०० स्वयंसेवक अंदाजे या चाचणीत सहभागी झाले आहेत.

बायोटेक कंपनी 'कोवोवॅक्स' च्या साथीने ही लस तयार केली जात आहे. सिरम इन्स्टिट्यूटकडून “कोव्हिशिल्ड नंतर कोवोवॅक्स या लसीला प्राधान्य दिले जाण्याची शक्यता आहे. बिजनेस टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, ऑस्ट्रेलियात मे २०२० मध्ये कोवोवॅक्स लसीच्या पहिल्या टप्प्यातील चाचणीला सुरुवात करण्यात आली असून यावर्षीच्या शेवटपर्यंत अंदाजे ३० हजार स्वयंसेवकांसह चाचणीचा तिसरा टप्पा सुरु होण्याची अंदाज वर्तविला जात आहे. सिरमला सोबत घेऊन पुढील वर्षी १०० कोटी डोस तयार करण्याची नोवोवॅक्सची योजना आहे.

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्या