शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती तुटली! पुण्यात भाजपा-NCP वेगळे लढणार; अजित पवार म्हणाले, "मी माझं सर्वस्व..."
2
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
3
Plane Crash Mexico Video: इमर्जन्सी लँडिंगआधीच विमान कोसळले; भयंकर अपघातात १० जण ठार
4
TV खरेदीचा विचार करत असाल तर आत्ताच करा, जानेवारीपासून किंमत वाढवण्याची तयारी; कारण काय?
5
आचारसंहिता लागण्यापूर्वी सत्ताधाऱ्यांची धावपळ; प्रकल्पाची उद्घाटने, भूमिपूजन अन् घोषणांचा सपाटा
6
कोट-पँट घालून फिरलात तर अटक अटळ! शिक्षा लेखी नाही, पण चाबकाचे फटकारे अन्...
7
आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२५: सरकारी कामात यश, अचानक धनलाभ; सुखाचा दिवस
8
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
9
क्रिकेटवेड्या देशाने मेस्सीवर जीव टाकला... पुढे? भारतीय फुटबॉलच्या विकासासाठी काय?
10
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
11
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
12
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
13
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
14
शत्रूला दिसणारच नाही भारताचे लढाऊ विमान, जळगावच्या बहिणाबाई विद्यापीठाचे संशोधन
15
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
16
सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला-उत्तर कमी, गुंता अधिक! न्यायालयीन सल्ल्यामुळे राजकीय अनिश्चितता वाढली
17
आचारसंहितेच्या आधीच निधीचे जीआर, उद्घाटने अन् भूमिपूजनाचा सपाटा; आयोगाची करडी नजर
18
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
19
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
20
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! सीरमचे ५ कोटी कोरोना डोस पडून; शासकीय आदेशाच्या दिरंगाईचा फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2021 11:56 IST

पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटने विकसीत केलेल्या कोव्हीशील्ड लशीचे जवळपास ५.५ कोटींहून अधिक डोस प्रयोगशाळेतच पडून असल्याची धक्कादायक माहिती समोर

पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटने ( serum institute of india ) विकसीत केलेल्या कोव्हीशील्ड (covishield) लशीचे जवळपास ५.५ कोटींहून अधिक डोस प्रयोगशाळेतच पडून असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. शासकीय आदेशाच्या दिरंगाईमुळे हे डोस अजूनही सीरममध्येच पडून आहेत, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. या दिरंगाईमुळे केंद्र सरकारने स्वत:हून जाहीर केलेल्या पहिल्या टप्प्यातील ३.३ कोटी जनतेच्या लशीकरणाचे लक्ष्य गाठणे देखील शक्य होणार नाही. दरम्यान, सीरमने याबाबत कोणतीही प्रतिक्रिया देण्यास टाळले आहे. पण सुत्रांच्या माहितीनुसार कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीकडून (सीआयआय) न वापरलेले लशीचे डोस सरकारने खरेदी करावेत आणि त्यांचा वापर करावा यासाठी जोरदार लॉबिंग केले जात आहे. (Serum Institute Sits on 55 Million Covishield Doses Awaiting Government Call )

लस बाजारात विकण्याची कंपन्यांची इच्छा; निर्यात करण्यासही परवानगी मिळणार?

"लशीकरणाच्या सर्व बाबींवर नियंत्रण ठेवण्याऐवजी सरकारने लसीकरण मोहिमेतील सर्व अडचणी आधी दूर करायला हव्यात", असं सीआयआयच्या सुत्रांनी सांगितलं. "ज्याप्रमाणे याआधी कोणत्याही खासगी लॅबकडून चाचण्या घेण्यात येणार नाहीत असा आग्रह करुन सुरुवातीच चाचण्या मोठ्या प्रमाणावर घेण्यास उशीर केला. त्याचप्रमाणे आता लसीकरणाच्या व्यवस्थापनाच्याबाबतीत गोंधळ निर्माण केला जात आहे", असंही एका अधिकाऱ्यानं सांगितलं. 

सीरम इंस्टिट्यूटचा मोठा करार; फिलीपींस सरकारला ३ कोटी कोविशिल्ड लसीचा पुरवठा करणार

SII ही पुण्यातील संस्था असूनही महाराष्ट्र सरकारलादेखील पुरेसे लसीचे डोस मिळाले नसल्याचं सांगण्यात येत आहे. महाराष्ट्र सरकारने आणखी डोस मिळण्याची अपेक्षा केली आहे. पण याबाबतची अधिकृत माहिती देणं टाळण्यात आलं आहे. दरम्यान, गेल्या आठवड्यात सीरमने २० लाख डोस पाठवले. ३ जानेवारी रोजी ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियानं (डीजीसीआय) देशात कोव्हॅक्सीन आणि कोव्हीशील्ड लशीला तात्काळ वापरासाठी मंजुरी दिली. पण कोव्हॅक्सीनच्या संपूर्ण चाचण्या झाल्या असल्याची टीका देखील याआधी करण्यात आली होती. दरम्यान, भारत बायोटकनं या सर्व चर्चा आणि दावे फेटाळून लावले आहेत.     

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस