शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाचे गंभीर संकट; पहिल्या तिमाहीत GDP मध्ये ऐतिहासिक 23.9 टक्क्यांची घसरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2020 18:35 IST

कोविड-१९ लॉकडाऊनमुळे भारताची अर्थव्यवस्था इतिहासातील सर्वात गंभीर मंदीतून जात आहे. परिणामी २०२०-२१ या चालू वर्षाच्या जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत सकल राष्ट्रीय उत्पन्न (जीडीपी) ४५ टक्के कमी होऊ शकते, असे भाकीत अमेरिकन मर्चंट बँकिंग कंपनी गोल्डमन सॅक्सने वर्तविले आहे.

कोरोना व्हायरसमुळे जगाच्या अर्थव्यवस्थेवर संकट आलेले असताना त्याचा भारताच्या अर्थव्यवस्थेवरही गंभीर परिणाम दिसून आला आहे. देशाच्या पहिल्या तिमाहीमध्ये सकल घरेलू उत्पादनात (GDP) 23.9 टक्क्यांची ऐतिहासिक घसरण नोंदिविली गेली आहे. केंद्रीय मंत्रालयाने आर्थिक वर्ष 2020-21 च्या एप्रिल ते जून या तिमाहिचे आकडे जाहीर केले आहेत. 

काही वेळापूर्वी मुख्य सेक्टरच्या आकड्यांनीही निराश केले होते. जुलै महिन्य़ामध्ये आठ इंडस्ट्रीच्या उत्पादनांमध्ये 9.6 टक्के घट झाली आहे. मंत्रालयाच्या आकड्यांनुसार पहिल्या तिमाहीत स्थिर किंमतीवर म्हणजेच रियल जीडीप 26.90 लाख कोटी रुपये राहिली आहे. गेल्या वर्षीच्या तिमाहीत ही जीडीपी 35.35 लाख कोटी रुपये होती. अशाप्रकारे यामध्ये 23.9 टक्क्यांची घट झाली आहे. गेल्या वर्षी जीडीपीमध्ये 5.2 टक्क्यांची वाढ झाली होती. 

देशात लॉकडाऊन असल्याने एप्रिल आणि मे महिन्यात सारे काही बंद होते. यामुळे अर्थव्यवस्थाच ठप्प झाली होती. जूनमध्ये याला थोडा वेग आला होता. यामुळे रेटिंग एजन्सी आणि अर्थतज्ज्ञांनी जून तिमाहीमध्ये जीडीपीदरात 16 ते 25 टक्के घट होऊ शकते, असा अंदाज व्यक्त केला होता. आज झालेली घसरण ही ऐतिहासिक आहे. 

तज्ज्ञांचे अंदाजकोविड-१९ लॉकडाऊनमुळे भारताची अर्थव्यवस्था इतिहासातील सर्वात गंभीर मंदीतून जात आहे. परिणामी २०२०-२१ या चालू वर्षाच्या जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत सकल राष्ट्रीय उत्पन्न (जीडीपी) ४५ टक्के कमी होऊ शकते, असे भाकीत अमेरिकन मर्चंट बँकिंग कंपनी गोल्डमन सॅक्सने वर्तविले आहे. अर्थतज्ज्ञ प्राची मिश्रा व अ­ॅर्न्ड्यू टिल्टन यांनी तयार केलेल्या अहवालात भारताने लॉकडाउन संपल्यानंतर अर्थव्यवस्था पुनरुज्जीवित करण्यासाठी २६५ अब्ज डॉलर्सचे (२१ लाख कोटी रुपये) पॅकेज तयार केल्याचा उल्लेख केला आहे. भारताची अर्थव्यवस्था २०२०-२१ वर्षाच्या आॅक्टोबर ते डिसेंबर या तिसऱ्या तिमाहीपासून वाढायला सुरुवात होईल व जीडीपी दर २० टक्के असेल, तर चौथ्या जानेवारी ते मार्च २०२१ या तिमाहीत हा दर १४ टक्के असेल. 

टॅग्स :Economyअर्थव्यवस्थाcorona virusकोरोना वायरस बातम्या