शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

Corona Vaccine: लहान मुलांसाठी वेगळी कोरोना लस बनवणं झालं आवश्यक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2021 07:25 IST

बालकांना संसर्गाचा कमी धोका; होऊ शकतात विषाणूंचे वाहक

नवी दिल्ली : कोरोना विषाणूचा लहान मुलांना सर्वात कमी धोका असला तरी, ते या विषाणूचे मोठे वाहक  ठरू शकतात. त्यामुळे निष्क्रिय विषाणूपासून मुलांसाठी कोरोना लस बनविणे आवश्यक बनले आहे. केंद्र सरकारने परवानगी दिल्यास भारत बायोटेक अशी लस बनविणार आहे.भारत बायोटेक कंपनीने २ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांसाठी लस बनविण्याची तयारी दर्शविली आहे. केंद्राने परवानगी दिल्यास या महिन्याच्या अखेरीस किंवा मार्च महिन्याच्या प्रारंभी या लसीच्या मानवी चाचण्या सुरू करण्याचा भारत बायोटेकचा विचार आहे. १६ वर्षे वयाखालील मुलांसाठी निष्क्रिय विषाणूपासून लस बनवावी, असा आंतरराष्ट्रीय नियम आहे. सक्रिय विषाणूपासून बनविलेली लस मुलांना देण्यात येत नाही. भारतात आपत्कालीन वापराची परवानगी मिळालेली भारत बायोटेकची कोवॅक्सिन लस निष्क्रिय विषाणूपासून बनविण्यात आली आहे. चिपांझीमध्ये इन्फ्लूएन्झा ज्यामुळे होतो, त्या एडेनो व्हायरसपासून ऑक्सफर्ड-अ‍ॅस्ट्राझेनेकाने कोविशिल्ड लस विकसित केली आहे. ही लसही भारतात लसीकरण मोहिमेत वापरली जात आहे. अमेरिका व युरोपमधील फायझर-बायोएनटेक व मॉडेर्ना कंपनीच्या लसी एमआरएनए प्रकारातील आहेत. उपचार घेणाऱ्यांची संख्या दीड लाखांहून कमीदेशात उपचार घेत असलेल्या कोरोना रुग्णांचे प्रमाण आणखी कमी होऊन ते १.३७ टक्के झाले आहे. या रुग्णांची संख्या १ लाख ४८ हजार आहे. कोरोना संसर्गातून १ कोटी ५ लाख ३४ हजार लोक बरे झाले आहेत. त्यांचे प्रमाण ९७.२० टक्के झाले आहे.  देशात कोरोनाचे १,०८,३८,१९४ रुग्ण असून, त्यातील १,०५,३४,५०५ रुग्ण बरे झाले. या संसर्गामुळे सोमवारी ८१ जण मरण पावले.कोरोनामुळे दररोज बळी जात असलेल्यांची संख्या १०० पेक्षा कमी असण्याची ही या महिन्यातील चौथी वेळ आहे. कोरोना बळींचा एकूण आकडा १,५५,०८० झाला आहे. सोमवारी कोरोनाचे ११,८३१ रुग्ण आढळले, तर ११,९०४ बरे झाले. कोरोना रुग्णांचा मृत्युदर १.४३ टक्के आहे. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस