चेन्नई : लोकप्रिय योजनांचा धडाका लावणाऱ्या तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी आता स्तनदा मातांसाठी एक नवी घोषणा केली आहे. येत्या काळात तामिळनाडूच्या बसस्थानकांवर स्तनपान करणाऱ्या महिलांसाठी स्वतंत्र कक्षाची सोय करावी, असा आदेश त्यांनी काढला आहे. महिलांना आपल्या मुलांना स्तनपान करण्यासाठी सुरक्षित एकांत मिळावा हा यामागचा उद्देश आहे.जागतिक स्तनपान सप्ताहाचे औचित्य साधून येत्या १ आॅगस्टपासून या नव्या योजनेचा शुभारंभ होणार आहे. स्तनपान करणाऱ्या महिलांना बसस्थानकांवर आडोसा वा एकांत शोधावा लागतो. स्तनपान करणाऱ्या महिलांची ही गैरसोय टाळण्यासाठी शहरे, नगरपालिका आणि बस डेपोशी संलग्न बसस्थानकांवर स्वतंत्र कक्ष उभारण्यात येणार असल्याचे यात म्हटले आहे. (वृत्तसंस्था)
स्तनपानासाठी वेगळा कक्ष
By admin | Updated: July 4, 2015 02:34 IST