शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

वरिष्ठ अधिका-यांच्या आरोपमुक्ततेला आव्हान देणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2018 11:34 IST

सोहराबुद्दीन बनावट चकमक प्रकरणी विशेष सीबीआय न्यायालयाने वरिष्ठ आयपीएस अधिकाºयांची आरोपमुक्तता केली आहे. विशेष न्यायालयाच्या या निर्णयाला आव्हान देणार नाही, अशी ठाम भूमिका सीबीआयने उच्च न्यायालयात सोमवारी घेतली.

मुंबई : सोहराबुद्दीन बनावट चकमक प्रकरणी विशेष सीबीआय न्यायालयाने वरिष्ठ आयपीएस अधिकाºयांची आरोपमुक्तता केली आहे. विशेष न्यायालयाच्या या निर्णयाला आव्हान देणार नाही, अशी ठाम भूमिका सीबीआयने उच्च न्यायालयात सोमवारी घेतली.कनिष्ठ अधिका-यांच्या आरोपमुक्तीच्या आदेशाला सीबीआयने आव्हान दिले आहे. मात्र वरिष्ठ आयपीएस अधिकाºयांच्या आरोपमुक्ततेला आव्हान देणार नाही, असे अ‍ॅडिशनल सॉलिसीटर जनरल अनिल सिंग व संदेश पाटील यांनी सीबीआयतर्फे न्या. रेवती मोहिते-डेरे यांना सांगितले.सोहराबुद्दीन शेख व तुलसीराम प्रजापती बनावट चकमक प्रकरणी २०१६ मध्ये विशेष सीबीआय न्यायालयाने गुजरातचे तत्कालीन पोलीस उपमहानिरीक्षक डी.जी. वंजारा, राजस्थानचे आयपीएस अधिकारी दिनेश एम.एन. आणि गुजरातचे आयपीएस अधिकारी राजकुमार पांडियन यांची आरोपातून मुक्तता केली. त्यांच्यावर खटला भरण्यासाठी सीबीआयने पूर्वमंजुरी घेतली नसल्याने विशेष न्यायालयाने या तिघांना आरोपमुक्त केले.या निर्णयाला सोहराबुद्दीनचा भाऊ रुबाबुद्दीन शेख याने उच्च न्यायालयात आव्हान दिले. त्यावर सोमवारी सुनावणी झाली. दिनेश एम.एन. व पांडियन यांना नोटीस पाठवली असून वंजारा यांनाही नोटीस पाठविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्याशी संपर्क साधू शकत नसल्याचे शेख याचे वकील गौतम तिवारी यांनी न्यायालयाला सांगितले. याआधीही न्यायालयाने सीबीआयला वंजारा यांच्या ठावठिकाण्याची माहिती देण्याचे निर्देश दिले होते. परंतु, सीबीआयने चुकीचा पत्ता दिल्याची बाब तिवारी यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणली.सीबीआय ही महत्त्वाची तपास यंत्रणा आहे. त्यांना प्रतिवाद्यांचा पत्ता मिळवण्यास काहीही अडचण यायला नको. आम्ही अनेक वेळा तपास यंत्रणेलाच नोटीस बजावण्यास सांगतो, त्यामुळे याही केसमध्ये सीबीआयने प्रतिवाद्यांना नोटीस बजावावी. त्यामुळे या प्रकरणाच्या सुनावणीला विलंब होणार नाही, असे न्या. डेरे यांनी सांगितले. या प्रकरणात ३८ जण आरोपी आहेत. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा व अन्य १४ आयपीएस अधिकाºयांची आरोपमुक्तता करण्यात आली आहे.सीबीआयच्या म्हणण्यानुसार, सोहराबुद्दीन शेख व त्याची पत्नी कौसर बी हैदराबादवरून सांगलीला येत असताना गुजरातमध्येच गुजरात एटीएसने त्यांना ताब्यात घेतले. शेखची हत्या करण्यात आली. मात्र तो चकमकीत मारला गेल्याचे दाखविण्यात आले. त्यानंतर त्याची पत्नी गायब झाली. या घटनेचा तुलसीराम प्रजापती हा एकच प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होता. त्याचीही पोलिसांनी हत्या केली.

टॅग्स :CBIगुन्हा अन्वेषण विभागSohrabuddin Sheikh encounter caseसोहराबुद्दीन शेख चकमक प्रकरण