शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

ज्येष्ठ विधिज्ञ राम जेठमलानी यांची निवृत्तीची घोषणा, केंद्र सरकारवर केली जोरदार टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2017 01:59 IST

नवी दिल्ली, दि. 10-  हाजी मस्तान, हर्षद मेहता असो वा केतन पारेख वादग्रस्त न्यायालयीन प्रकरण आणि विधिज्ञ राम जेठमलानी हे गेली सात दशके असणारं समीकरण. मात्र, राम जेठमलानी यांनी आज आपल्या वकिली व्यवसायातून निवृत्त होत असल्याची घोषणा केली आहे. ही निवृत्तीची घोषणा करताना त्यांनी केंद्र सरकारवर नेहमीच्या शैलीत कडक भाषेत टीकाही ...

नवी दिल्ली, दि. 10-  हाजी मस्तान, हर्षद मेहता असो वा केतन पारेख वादग्रस्त न्यायालयीन प्रकरण आणि विधिज्ञ राम जेठमलानी हे गेली सात दशके असणारं समीकरण. मात्र, राम जेठमलानी यांनी आज आपल्या वकिली व्यवसायातून निवृत्त होत असल्याची घोषणा केली आहे. ही निवृत्तीची घोषणा करताना त्यांनी केंद्र सरकारवर नेहमीच्या शैलीत कडक भाषेत टीकाही केली असून पुढील काळातही आपण भ्रष्ट राजकारण्यांविरोधात लढत राहू असे स्पष्ट केले . नवे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांचा सन्मानसोहळा बार कौन्सिल ऑफ इंडियाने आयोजित केला होता, त्यावेळी त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली.

सध्या देशाची स्थिती आजिबात चांगली नाही, सध्याच्या व त्याच्या आधीच्या सरकारने या देशाला अत्यंत खालच्या पातळीवर आणून ठेवले आहे. या परिस्थितीवर मात करण्याची जबाबदारी बारच्या सर्व सदस्यांची व चांगल्या नागरिकांची आहे, त्यामुळेच सत्ताधा-यांना बाहेरचा रस्ता दाखवता येईल, अशा शब्दांत जेठमलानी यांनी आपले मत मांडले. मी आज निवृत्तीची घोषणा करत आहे, मात्र जीवंत असे पर्यंत भ्रष्ट राजकारण्यांविरोधात लढतच राहिन, असेही ते यावेळी म्हणाले.

राम जेठमलानी यांचा जन्म १४ सप्टेंबर १९२३ रोजी तत्कालीन मुंबई प्रांत असलेल्या पाकिस्तानमधील शिकारपूरमध्ये झाला. त्यांनी एस. सी. शहानी लॉ कॉलेजमधून वयाच्या १७ व्या वर्षी कायद्याची पदवी संपादन केली. त्यानंतर त्यांनी अनेक खटल्यांचे कामकाज पाहिले.  

राम जेठमलानी यांनी ‘या’ व्यक्तींसाठी केलीय वकिली!- माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या मारेक-यांची बाजू न्यायालयात मांडली. - दिल्लीतील उपहार सिनेमा आग प्रकरणी मालक अन्सल बंधुंविरोधातील खटला.- जेसिका हत्या प्रकरणातील मनू शर्माची न्यायालयात बाजू मांडली. -  १६ वर्षांच्या मुलीवरील बलात्कार प्रकरणातील आरोपी आसाराम बापूसाठी त्यांनी खटला लढवला.- लालकृष्ण अडवाणी यांची हवाला खटल्यात बाजू मांडली. - सोहराबुद्दीन खटल्यात भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या बाजूने न्यायालयात लढले.- २ जी घोटाळ्यातील डीएमके नेत्या कनिमोळी यांच्यातर्फे त्यांनी बाजू मांडली.- शेअर बाजारातील दलाल हर्षद मेहता यांची बाजू न्यायालयात मांडली. याचबरोबर, हाजी मस्तान आणि केतन पारेख यांची सुद्धा त्यांनी वकिली केली.- कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्याविरोधातील अवैध उत्खनन खटल्यात त्यांची बाजू मांडली. - चारा घोटाळा प्रकरणी बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांच्यातर्फे न्यायालयात युक्तिवाद केला.- केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी दाखल केलेल्या मानहानी प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची सुद्धा त्यांनी या प्रकरणात बाजू मांडली. मात्र, नंतर याप्रकरणातून त्यांनी माघार घेतली. 

 

 

 

टॅग्स :Courtन्यायालय