खतांची जादा दराने विक्री
By admin | Updated: May 12, 2014 22:59 IST
शेतकर्यांची लूट : कल सेंद्रिय खताकडे
खतांची जादा दराने विक्री
शेतकर्यांची लूट : कल सेंद्रिय खताकडेसावरवाडी : करवीर तालुक्यात ऐन उन्हाळी हंगामात खत विक्रेते विविध रासायनिक खतांची जादा दराने विक्री करू लागल्याने रासायनिक खतातून शेतकर्यांची लूट सुरू आहे. ऐन हंगामात खतांचे दर वाढवून जादा दराने खतांची विक्री केली जात आहे.एकीकडे वाढत्या महागाईच्या काळात शेतीच्या खर्चाचे प्रमाण वाढले आहे, तर दुसरीकडे उसाची बिले वेळेत शेतकर्यांना मिळत नाही. लोकसभेच्या निवडणुकीनंतर रासायनिक खतांचे ग्रामीण भागातील खत विक्रेते दुकानदार जादा दराने खताची विक्री करू लागले आहेत.रासायनिक खतांच्या किमती वाढल्यामुळे शेतकर्यांचा कल शेणखत व सेंद्रिय जीवाणू खते वापरण्याकडे आहे. रासायनिक खतांची जादा दराने विक्री करून ग्रामीण भागातील दुकानदारांकडून व सहकारी संस्थांकडून लूट केली जात आहे. जादा दराच्या पावत्याही शेतकर्यांना दिल्या जात नाहीत. या गैरप्रकाराची चौकशी करण्याची मागणी शेतकर्यांच्याकडून केली जात आहे.आगामी खरीप हंगाम तोंडावर आल्याने जादा दराने रासायनिक खतांची विक्री करण्यात येत आहे. यंदा शेतकर्यांना रासायनिक खतापासून आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. शेतीला लागणार्या रासायनिक खतांचे दर भडकल्याने खत घेण्याकडे शेतकर्यांनी पाठ फिरवली आहे. ग्रामीण भागातील खत विक्रीही दुकानदारांनी जादा आर्थिक नफा होण्याकरिता जादा दराने खताची विक्री सुरू केली आहे.दरम्यान, रासायनिक खतांचे दर सर्वत्र स्थिर न केल्यास अथवा जादा दराने खतांची विक्री केल्यास तीव्र स्वरुपाचे आंदोलन शेतकरी कामगार पक्षातर्फे करणार असल्याचा इशारा करवीर पंचायत समितीचे सदस्य राजेंद्र सूर्यवंशी यांनी दिला.वार्ताहर.