शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
2
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
3
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
4
पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास देशातून तीव्र विरोध, टीम इंडिया दबावात, ड्रेसिंग रूममधून आली अशी बातमी
5
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
6
BMW ने कार आणि बाईक्सच्या किमतीत केली मोठी कपात; तब्बल ₹१३.६ लाखांची होणार बचत...
7
सोन्याची विक्रमी झेप! आठवड्यात ३,३०० रुपयांनी महागले; चांदीचाही नवा उच्चांक, आजचा दर काय?
8
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
9
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
10
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
11
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
12
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
13
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
14
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
15
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
16
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
17
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
18
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
19
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
20
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी

दोन महिला लष्करी अधिकाऱ्यांची वैमानिक प्रशिक्षणासाठी निवड

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2021 06:55 IST

pilot training : या दोन महिला अधिकारी महाराष्ट्रातील नाशिक येथील लढावू लष्कर उड्डयन प्रशिक्षण शाळेत प्रशिक्षण घेतील. १५ महिला अधिकाऱ्यांनी लष्कराच्या उड्डयन दलात सामील होण्याची इच्छा व्यक्त केली होती.

नवी दिल्ली :  भारतीय लष्कराने ऐतिहासिक निर्णय घेत लष्कराच्या उड्डयन विभागाच्या लढावू हेलिकॉप्टरचे वैमानिक म्हणून प्रशिक्षण देण्यासाठी दोन महिला अधिकाऱ्यांची निवड केली आहे. लष्कर प्रमुख एम. एम. नरवणे यांनी वैमानिक म्हणून महिलांचा समावेश करण्याचा प्रस्ताव मंजूर केल्यानंतर सहा महिन्यांनी दोन महिला अधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. या दोन महिला अधिकारी महाराष्ट्रातील नाशिक येथील लढावू लष्कर उड्डयन प्रशिक्षण शाळेत प्रशिक्षण घेतील. १५ महिला अधिकाऱ्यांनी लष्कराच्या उड्डयन दलात सामील होण्याची इच्छा व्यक्त केली होती. तथापि, दोनच महिला अधिकारी कठोर निवड प्रक्रियेतून पात्र झाल्या. प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर पुढल्या वर्षी या दोन महिला अधिकारी लष्कराच्या उड्डयण दलाच्या सेवेत रुजू होतील.२०१८ मध्ये फ्लाईंग ऑफिसर अवनी चतुर्वेदी यांनी लढावू विमानाच्या पहिल्या भारतीय सारथी होऊन भारतीय वायुदलाच्या इतिहासात नवा अध्याय जोडला होता. मागच्या वर्षी भारतीय नौदलानेही महिला वैमानिकांची पहिली तुकडी डॉर्नियर सागरी विमान विभागात तैनात करण्याची घोषणा केली होती.

टॅग्स :airplaneविमान