शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

निवडक पॅसेंजर गाड्या उद्यापासून धावणार,आजपासून तिकीट बुकिंग, पहिली ट्रेन नवी दिल्लीहून मुंबई सेंट्रलला येणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2020 06:38 IST

कोविड-१९ साठी २० हजार डबे राखून ठेवल्यानंतर आणि स्थलांतरितांसाठी दररोज चालविण्यात येणाºया ३०० श्रमिक रेल्वेतील उपलब्ध डब्यांचा विचार करून नव्या मार्गांवर सेवा सुरू होईल.

नवी दिल्ली/मुंबई : रेल्वेची प्रवासी सेवा १२ मेपासून सुरू करण्याची योजना आहे. प्रारंभी, १५ जोड्या रेल्वेंसह (३० परतीचे प्रवास) ती सुरू होईल. या रेल्वे विशेष रेल्वे म्हणून धावतील व नवी दिल्ली स्थानकातून दिब्रुगढ, आगरतळा, हावडा, पाटणा, बिलासपूर, रांची, भुवनेश्वर, सिकंदराबाद, बंगळुरू, चेन्नई, थिरुवनंतपुरम, मडगाव, मुंबई सेंट्रल, अहमदाबाद, जम्मू तावीला जोडणाऱ्या असतील.कोविड-१९ साठी २० हजार डबे राखून ठेवल्यानंतर आणि स्थलांतरितांसाठी दररोज चालविण्यात येणाºया ३०० श्रमिक रेल्वेतील उपलब्ध डब्यांचा विचार करून नव्या मार्गांवर सेवा सुरू होईल. प्रवाशांनी मास्क वापरणे व निर्गमनाच्या (डिपार्चर) ठिकाणी स्क्रीनिंग करून घेणे बंधनकारक आहे. ज्या प्रवाशांमध्ये कोविड-१९ ची स्पष्ट लक्षणे नसलेल्यांनाच प्रवासाची परवानगी दिली जाईल, असे रेल्वे मंत्रालयाचे कार्यकारी संचालक राजेश दत्त वाजपेयी यांनी निवेदनात म्हटले.आयआरसीटीसी संकेतस्थळावर तिकिटेया रेल्वेंच्या रिझर्व्हेशनसाठी बुकिंग ११ मे रोजी दुपारी ४ वाजेपासून सुरू होईल आणि ते आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावरच  उपलब्ध असेल.च्रेल्वे स्थानकांवर तिकीट बुकिंग खिडक्या बंद राहतील आणि प्लॅटफॉर्म्स तिकिटासह कोणतेही तिकीट दिले जाणार नाही. ज्या प्रवाशांकडे वैध कन्फर्म तिकिटे असतील त्यांनाच रेल्वे स्थानकात प्रवेश दिला जाईल.मजुरांच्या तिकिटाचे शुल्क मुख्यमंत्री सहायता निधीतूनमुंबई : परराज्यातून महाराष्टÑात येणाºया आणि परराज्यात जाणाºया मजुरांचे रेल्वेभाडे मुख्यमंत्री सहायता निधीतून भरण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. या मजुरांकडे रेल्वे प्रवासाला लागणारे भाडे देण्यासाठी पैसे नसल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. संबंधित जिल्हाधिकारी यांना त्यांच्या मागणीप्रमाणे ही रक्कम निधीतून वर्ग करण्यात येईल.दररोज ३०० श्रमिक विशेष गाड्यास्थलांतरित मजुरांंसाठी विशेष रेल्वेगाड्या चालवू द्याव्या, असे आवाहन रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी सर्व राज्यांना केले असून, दररोज ३०० श्रमिक विशेष ट्रेन्स चालविण्यास रेल्वे गेल्या सहा दिवसांपासून तयार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.पहिली ट्रेन नवी दिल्ली-मुंबई सेंट्रलसाठी धावणार आहे. हीच ट्रेन मुंबई सेंट्रलवरून नवी दिल्लीला जाईल. या गाडीच्या वेळेबाबतचे नियोजन केले जात असल्याचे आयआरसीटीसीचे जनसंपर्क अधिकारी पिनाकीन मोरावाला यांनी सांगितले.रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, रेल्वे विभाग दररोज ३०० विशेष रेल्वेगाड्या चालवू शकते. त्यामुळे पाच दिवसांत जवळपास २० लाख स्थलांतरित मजुरांंना त्यांच्या इच्छित ठिकाणी पोहोचविणे शक्य आहे. तथापि, प. बंगाल, राजस्थानसह इतर राज्ये यासाठी मंजुरी देत नाहीत. देशभरात १० मेपर्यंत ३६६ श्रमिक विशेष रेल्वेगाड्या चालविल्या असून, त्यापैकी २८७ रेल्वेगाड्या इच्छित ठिकाणी पोहोचल्या आहेत, तर ७९ गाड्या मार्गात आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndian Railwayभारतीय रेल्वे