शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पाकला जाणारे अणुसाहित्य जप्त; न्हावा-शेवात पकडला २२ हजार काेटींचा साठा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2024 05:05 IST

हे संशयास्पद साहित्य भारतीय किनारपट्टीवर सापडल्याने खळबळ उडाली. तपासणीत संगणक संख्यात्मक नियंत्रण (सीएनसी) मशिन सापडले आहे.

मुंबई/नवी मुंबई : चीनमधून कराचीकडे जाणाऱ्या जहाजातून पाकिस्तानच्या आण्विक आणि बॅलेस्टिक क्षेपणास्त्र कार्यक्रमासाठी वापरता येऊ शकतील, अशा संशयास्पद २२ हजार १८० किलोग्रॅम साहित्याचा साठा मुंबईच्या समुद्रात सुरक्षा यंत्रणांनी पकडला. हे संशयास्पद साहित्य भारतीय किनारपट्टीवर सापडल्याने खळबळ उडाली. तपासणीत संगणक संख्यात्मक नियंत्रण (सीएनसी) मशिन सापडले आहे.

चीनमधील तैयुआन माइनिंग इम्पोर्ट ॲण्ड एक्स्पोर्ट कंपनीने हा माल पाकिस्तानमधील कॉसमॉस इंजिनीअरिंगच्या नावाने पाठविला होता. ही कारवाई २३ जानेवारी २०२४ रोजी केली असली, तरी युरोप आणि अमेरिकेतून प्रतिबंधक अणुसाहित्य पाकिस्तान छुप्या मार्गाने चीनमधून मागवत असल्याचा खुलासा झाला  स्थानिक अधिकाऱ्यांनी ही कारवाई बंदरात नव्हे तर भरसमुद्रात केल्याचे म्हटले आहे. 

पकडलेल्या मशिनचा वापर पाकिस्तान त्यांच्या आण्विक आणि बॅलेस्टिक क्षेपणास्त्र कार्यक्रमांत करू शकतो, असा संशय यंत्रणांना आहे. ते इटालियन कंपनीने बनवलेले कॉम्प्युटर न्युमेरिकल कंट्रोल मशीन आहे. यामध्ये आण्विक आणि क्षेपणास्राशी संबंधित भाग सापडले. 

भारतीय बंदरातून वाहतूक फेब्रुवारी २०२० मध्ये, चीन ‘इंडस्ट्रिअल ड्रायर्स’च्या नावाखाली पाकिस्तानला ऑटोक्लेव्हचा पुरवठा करत असल्याचे आढळले होते.

यामुळे चीनमधून ‘दुहेरी-वापर’ लष्करी दर्जाच्या वस्तूंच्या नावाखाली पाकिस्तान भारतीय बंदरामार्गे आण्विक कार्यक्रमांसंबंधित साहित्य मागवीत असल्याचे पुन्हा उघड झाले. कॉसमॉस इंजिनीअरिंग, ही पाकिस्तानी कंपनी तेव्हापासूनच वॉचलिस्टवर आहे. 

नियमांचं उल्लंघनजप्तीच्या कारवाईमुळे पाकिस्तान क्षेपणास्त्रांच्या बेकायदेशीर व्यापारात आणि मिसाईल टेक्नॉलॉजी कंट्रोल रेजिमचे (एमटीसीआर) उल्लंघन करत असल्याची भीती बळकट झाली असल्याचेही या जेएनपीटी बंदरातील एका सीमा शुल्क अधिकाऱ्याने सांगितले.  

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारत