शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

Seema Haider : "तुला कोणीही मारणार नाही, तू परत ये"; ढसाढसा रडली सीमाची बहीण, मोदींकडे मागितली मदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2025 17:59 IST

Seema Haider : सीमा हैदरची बहीण रीमाचा एक व्हिडीओ समोर आला आहे ज्यामध्ये ती ढसाढसा रडत आहे आणि सीमाला घरी परत येण्याचं आवाहन करत आहे.

भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढत असताना सीमा हैदर देखील चर्चेत आली होती. लोक तिला पाकिस्तानात परत पाठवण्याची मागणी करत आहेत. याच दरम्यान आता सीमा हैदरची बहीण रीमाचा एक व्हिडीओ समोर आला आहे ज्यामध्ये ती ढसाढसा रडत आहे आणि सीमाला घरी परत येण्याचं आवाहन करत आहे. भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाचा उल्लेख करताना ती म्हणाली की, सीमा हैदर आणि तिची मुलं भारतात सुरक्षित नाहीत. म्हणून त्यांनी ताबडतोब पाकिस्तानात यावं. हा व्हिडीओ सीमा हैदरचा पाकिस्तानी पती गुलाम हैदरने पोस्ट केला आहे.

बुरखा घातलेली एक महिला व्हिडिओमध्ये रडत रडत सीमाला परत येण्याची विनंती करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये असा दावा केला जात आहे की ही महिला सीमा हैदरची बहीण रीमा आहे. "सीमा, तू कधीतरी तुझ्या कुटुंबातील सदस्यांवर प्रेम केलं असशीलच. तिथली परिस्थिती सुरक्षित नाही. जर भारतातील लोक तुला पाठवू इच्छितात तर तुला का यायचं नाही? तुझी मुलं सुरक्षित नाहीत. तू परत ये. तुला कोणीही मारणार नाही. तू गुलाम हैदर भाईंची पत्नी आहेस. ते तुला माफ करतील. तुम्हाला कोणीही काहीही म्हणणार नाही."

"मोदीजी आणि योगीजी आमची मदत करा"

"मी मोदीजी आणि योगीजी यांना आमची मदत करा असं सांगू इच्छिते. जर व्हिसा असलेल्या लोकांचा व्हिसा रद्द करून त्यांना परत पाठवू शकता, तर ते सीमाला का पाठवू शकत नाहीत? तिचे तिथे कोणी नातेवाईकही नाहीत. ती चार मुलांना बेकायदेशीरपणे घेऊन गेली आहे. तिचा तलाक झालेला नाही. ती खोटे बोलत आहे. सीमाला खोटं बोलायला शिकवण्यात आलं आणि जर ती तिथे गेली तर तिला मारले जाईल अशी धमकी देण्यात आली होती. कृपया आम्हाला मदत करा."

"तुला आमची आठवण येत नाही का?"

"तुला आमची आठवण येत नाही का? मला रात्री झोप येत नाही. माझ्या मनात फक्त एकच गोष्ट येते की माझी बहीण आणि मुलं कोणत्या परिस्थितीत असतील? मला माहित आहे की तू चूक केली आहेस, पण तू माफी मागू शकतेस. हैदर तुला मारणार नाहीच. सीमा खोटं बोलत आहे की तिचा आणि गुलाम हैदरचा तलाक झाला आहे. तलाक झालेला नाही. तिला खोटं बोलायला लावलं जात आहे" असं रीमाने म्हटलं आहे.  सीमा हैदर पाकिस्तानहून नेपाळमार्गे भारतात आली होती आणि सध्या ती नोएगा येथील सचिन मीनाच्या घरी राहत आहे.  

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तानNarendra Modiनरेंद्र मोदीViral Videoव्हायरल व्हिडिओSocial Viralसोशल व्हायरल