शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

"मी हिंदू आहे, जे करायचं ते करा"; भारतात आलेल्या सीमा हैदरने पाकिस्तानला दिलं जोरदार उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2023 14:50 IST

पाकिस्तानला परत पाठवण्याच्या चर्चेदरम्यान सीमाने एका व्हिडिओ मेसेजमध्ये पाकिस्तानला जोरदार उत्तर दिलं आहे.

पाकिस्तानातून आपल्या चार मुलांसह भारतात अवैधरित्या घुसलेली सीमा हैदर सध्या चर्चेत आहे. पती गुलाम हैदरला सोडून तिने आता नोएडा येथील रब्बूपुरा येथे सचिन मीणाला पती म्हणून स्वीकारले आहे. पाकिस्तानला परत पाठवण्याच्या चर्चेदरम्यान सीमाने एका व्हिडीओ मेसेजमध्ये पाकिस्तानला जोरदार उत्तर दिलं आहे.

सीमा हैदर म्हणाली, "माझा हा एक व्हिडीओ पाकिस्तानमधील लोकांसाठी आहे. हवे तितके गंभीर आरोप लावा. हवा तितका कट रचा. येथील एजन्सी सर्वकाही क्लिअर करत आहे. मी इथे क्लिअर होताच मी माझा पती सचिनसोबत राहीन आणि त्याच्यासोबतच जगेन आणि त्याच्यासोबतच मरेन."

सीमा हैदर म्हणते की, आता ती भारताला आपला देश मानते. सचिन तिचा नवरा आहे. नेपाळमधील पशुपतीनाथ मंदिरात लग्न झाल्याचा दावा सीमा आणि सचिन यांनी केला आहे. सीमा हैदरने व्हिडीओ शेअर करत म्हटलं आहे की, "कोणी काहीही म्हणा... हे होऊ शकत नाही. कारण माझे प्रेम, माझे सर्वस्व माझा सचिन आहे. त्याचा माझ्यावर विश्वास आहे आणि माझा त्यांच्यावर विश्वास आहे. हो, मी हिंदू आहे, मला हिंदू असल्याचा अभिमान आहे. मी भारतात आले, बघा एक दिवस सगळे माझे प्रेम स्वीकारतील."

सचिनचे कुटुंबीय आता सीमा हैदरला कोणालाही भेटू देत नाहीत. कुटुंबीयांचे म्हणणे आहे की, सीमा हैदर 24 तासांपैकी 18 तास मीडिया आणि सोशल मीडियाच्या लोकांना भेटत आहे, त्यामुळे तिला वेळेवर जेवण करता आले नाही. झोपही येत नव्हती. सतत बोलत असताना तिची प्रकृती खालावली. सचिनच्या कुटुंबीयांनी सांगितले की, ती डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घेत आहे. डॉक्टरांनी तिला आराम करण्याचा सल्ला दिला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तान