शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवा अन्यथा 26/11...', मुंबई पोलिसांना धमकीचा फोन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2023 18:51 IST

मुंबई क्राइम ब्रांच या प्रकरणाचा तपास करत आहे.

Seema Haider News:पाकिस्तानातून आलेल्या आणि उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथे राहणाऱ्या सीमा हैदर बाबत मुंबई पोलिसांना धमकीचा फोन आला आहे. फोन करणार्‍याने म्हटले की, सीमा हैदर पाकिस्तानात परत न आल्यास भारत उद्ध्वस्त होईल. कॉलरने मुंबईतील वाहतूक नियंत्रण कक्षाला फोन करून 26/11 सारख्या दहशतवादी हल्ल्यासाठी तयार राहण्याची धमकी दिली. हा कॉल 12 जुलै रोजी मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला आला होता, त्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

सचिन मीना नावाच्या व्यक्तीच्या प्रेमात पडल्यानंतर सीमा पाकिस्तानातून नेपाळमार्गे भारतात आली आणि ग्रेटर नोएडामध्ये राहत आहे. मोबाईलवर ऑनलाइन PUBG गेम खेळत असताना दोघेही प्रेमात पडले. सचिनची ओळख झाल्यानंतर सीमाने बेकायदेशीरपणे भारतात प्रवेश केला. भारतात आल्यानंतर तिला आणि सचिनला तुरुंगवास झाला, नंतर दोघांना जामीन मिळाला. सध्या दोघेही सोबत राहत आहेत. सचिनसाठी हिंदू धर्म स्वीकारल्याचा दावा सीमाने केला आहे. सीमाला परत पाकिस्तानात जायचे नाही. पाकिस्तानात गेल्यास तिला मारले जाईल, असे तिचे म्हणणे आहे.

 

सीमा जैसमाबाद येथील रहिवासी सीमा हैदर पाकिस्तानातील सिंध प्रांतातील जैसमाबाद येथील रहिवासी आहेत. कागदपत्रांनुसार तिचा विवाह गुलाम रझा याच्याशी 2014 मध्ये झाला होता. तिला चार मुले आहेत. 2019 मध्ये गुलाम हैदर कामानिमित्त सौदी अरेबियाला गेला. 2019 नंतर तो कधीही घरी परतला नाही. 2020 मध्ये सीमाने ग्रेटर नोएडा येथील जेवार गावात राहणाऱ्या सचिनशी PUBG गेमद्वारे मैत्री केली. 

कराची ते शारजा, काठमांडूमार्गे भारतात ती 10 मार्च रोजी नेपाळमध्ये आली होती. सीमाने दावा केला की, दोघांनी नेपाळमधील मंदिरातच लग्न केले. लग्नानंतर ती पाकिस्तानात परतली, पण सीमाला सचिनसोबत राहायचे होते. म्हणून 10 मे रोजी ती चार मुलांसह कराची शहरातून शारजाहला पोहोचली. त्यानंतर येथून विमानाने काठमांडूला पोहोचली आणि तिथून खासगी वाहनाने भारतात दाखल झाली. सचिन आणि सीमा दिल्लीतील राबुपुरा भागात भाड्याच्या घरात राहू लागले. पोलिसांना याची माहिती मिळताच दोघांनाही 2 जुलै रोजी अटक करण्यात आली. मात्र, दोघेही सध्या कोर्टातून जामिनावर सुटले आहेत.

टॅग्स :Mumbai policeमुंबई पोलीसPakistanपाकिस्तानIndiaभारतLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट26/11 terror attack26/11 दहशतवादी हल्ला