शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

Amarnath Yatra: अमरनाथ यात्रेसाठी यंदा कडक सुरक्षा व्यवस्था

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2025 14:17 IST

Amarnath Yatra Security: जम्मू: अमरनाथ यात्रामार्गावर यंदा सुरक्षा बंदोबस्त प्रचंड वाढवण्यात आला आहे.

सुरेश एस. डुग्गर,लोकमत न्यूज नेटवर्क

जम्मू: अमरनाथ यात्रामार्गावर यंदा सुरक्षा बंदोबस्त प्रचंड वाढवण्यात आला आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’च्या पार्श्वभूमीवर संभाव्य हल्ल्यांचा धोका लक्षात घेता जम्मू-काश्मीर पोलिस, लष्कर, केंद्रीय राखीव पोलिस दलासह निमलष्करी दलाचे जवानही तैनात करण्यात आले आहेत.

पवित्र अमरनाथ गुहेत दर्शन घेण्यासाठी यंदा यात्रेकरूंची गर्दी होण्याची शक्यता पाहता हा बंदोबस्त करण्यात आला आहे. या देवस्थानात जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांच्या हस्ते पहिली पूजा करण्यात आली असून, बाबा बर्फानींच्या दर्शनासाठी औपचारिकदृष्ट्या यात्रा प्रारंभ झाली आहे. प्रत्यक्ष यात्रा ३ जुलै ते ९ ऑगस्टपर्यंत चालेल. यंदा अमरनाथ यात्रा ५२ दिवसांऐवजी ३८ दिवसांची असणार आहे. यंदाची सुरक्षा व्यवस्था पाहता यात्रेकरूंनी फार चिंता करण्याची गरज नाही, असे सिन्हा यांनी म्हटले आहे. मात्र, अधिकाऱ्यांच्या मते यंदा या यात्रेत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. पाकिस्तानी ‘आयएसआय’चे हस्तक या यात्रेत यंदा कारवाया करू शकतात. त्यामुळे सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे.

यात्रेचे दोन मार्गपरंपरागत पहलगामच्या चंदनबाडीहून एक मार्ग असून, दुसरा मार्ग बालाटालमार्गे आहे. जुना मार्ग थोडा लांबचा आहे. पहलगामपासून गुहेपर्यंतचा मार्ग ४८ किमी तर बालाटाल मार्ग १४ किमीचा आहे. दोन्ही मार्गांवर सुरक्षाविषयक ऑडिट केले आहे. 

अशी असेल सुरक्षायात्रेत यंदा सुरक्षा जवानांच्या ताफ्यासह जॅमर असतील. मागे-पुढे एक्स्कॉर्ट वाहने असतील. तत्पर कृती दलाची पथके असतील. बॉम्बशोधक पथके, पोलिसांचे श्वानपथक आणि हेलिकॉप्टरसह आधुनिक उपकरणांनी निगराणी केली जाईल.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीर