शहरं
Join us  
Trending Stories
1
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
2
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
3
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
4
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
5
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
6
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
7
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
9
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
10
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
11
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
12
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
13
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
14
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
15
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
16
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
17
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
18
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
19
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

बांदीपोरामध्ये दहशतवादी लपल्याची माहिती, सुरक्षा दलाची शोध मोहिम सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2021 14:38 IST

Jammu Kashmir:दहशतवाद्यांच्या हल्ल्यात शनिवारी जखमी झालेल्या व्यक्तीचा मृत्यू

श्रीनगर:जम्मू-काश्मीरच्या बांदीपोरामध्ये काही दहशतवादी लपल्याची माहिती समोर आली आहे. सुरक्षा दलाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे बांदीपोरामध्ये शोधमोहीम सुरू झाली आहे. सुरक्षा दलाने जिल्ह्यातील अरिनच्या जंगल परिसराला वेढा घातला असून शोधमोहीम सुरू आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, सुरक्षा दलाच्या संयुक्त पथकाने परिसरात दहशतवाद्यांच्या उपस्थितीच्या माहितीनंतर अरिनच्या जंगल परिसरात शोध सुरू केला.

दुसरीकडे, जम्मू-काश्मीरमध्ये श्रीनगरच्या बटमलू भागात दहशतवाद्यांकडून जखमी झालेल्या एका नागरिकाचा मृत्यू झाला आहे. दहशतवाद्यांनी शनिवारी रात्री 8 च्या सुमारास बटामालू रहिवासी मोहम्मद शफी दार यांच्यावर गोळीबार केला होता, ज्यात ते जखमी झाले होते. रात्री त्यांचा मृत्यू झाला. शनिवारी दहशतवाद्यांनी ठार मारलेली डार ही दुसरी व्यक्ती आहे. याआधी शनिवारी संध्याकाळी दहशतवाद्यांनी करण नगरमधील श्रीनगरमधील चटबल येथील रहिवासी माजिद अहमद गोजरी यांची गोळ्या घालून हत्या केली होती. 

सीआरपीएफ बंकरवर ग्रेनेड हल्ला

अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी शनिवारी संध्याकाळी अनंतनाग जिल्ह्यातील केपी मार्ग येथे केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) बंकरवर ग्रेनेड फेकला, परंतु स्फोटात कोणतेही नुकसान झाले नाही. हा हल्ला अशा वेळी झाला जेव्हा श्रीनगरमध्ये संध्याकाळीच दहशतवाद्यांनी एका नागरिकाची गोळ्या घालून हत्या केली होती. 

काश्मीरमध्ये ड्रोनने पाठवला मोठा शस्त्रसाठा

जम्मू-काश्मीर पोलिसांनी आज आंतरराष्ट्रीय सीमेजवळ पाकिस्तानकडून ड्रोनद्वारे सोडलेल्या शस्त्रांचा मोठा साठा जप्त केला आहे. पाकिस्ताकडून ड्रोनने टाकलेल्या पॅकेटमधून एक AK-47, तीन पाकिस्तानी मासिकं, 30 काडतूस आणि एक दुर्बिण जप्त करण्यात आल्याचं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं. आंतरराष्ट्रीय सीमेपासून सुमारे सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या फलाईन मंडळाच्या सौंजना गावात हे शस्त्र टाकण्यात आले होते.

 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरterroristदहशतवादी