शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

 बुरखाधारी दहशतवाद्यांनी वाढवली सुरक्षा दलांची चिंता 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2018 13:25 IST

गेल्या काही काळापासून जम्मू आणि काश्मीरमध्ये लष्कराकडून दहशतवाद्यांविरोधातील मोहीम तीव्र करण्यात आली आहे. मात्र लष्कराच्या जवानांना चकमा देण्यासाठी दहशतवादीही विविध युक्त्या योजू लागले आहेत.

श्रीनगर - गेल्या काही काळापासून जम्मू आणि काश्मीरमध्ये लष्कराकडून दहशतवाद्यांविरोधातील मोहीम तीव्र करण्यात आली आहे. मात्र लष्कराच्या जवानांना चकमा देण्यासाठी दहशतवादीही विविध युक्त्या योजू लागले आहेत. मागच्या काही दहशतवादी घटनांदरम्यान दहशतवाद्यांनी बुरखा परिधान करून हल्ला करण्याची चाल खेळली असून, दहशतवाद्यांच्या या चालीमुळे लष्कराच्या चिंतेत वाढ झाली आहे. सुरक्षा दलांच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी बुरखा परिधान करून हल्ला केल्याच्या गेल्या वर्षभरात डझनभर घटना घडल्या आहेत. प्रत्यक्षात मात्र हा आकडा मोठा असू शकतो. दहशतवाद्यांनी अवलंबलेल्या या तंत्रामुळे सुरक्षा दलांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. त्यामुळे आता सर्च ऑपरेशन हाती घेताना महिला अधिकाऱ्यांचीही मदत घेण्याचा विचार सुरक्षा दलांकडून सुरू आहे.   दहशतवाद्यांविरोधातील शोधमोहीम आणि दहशतवाद्यांना घेरल्यानंतर स्थानिक नागरिक आणि महिला मोठ्या प्रमाणावर समोर येतात. त्यामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. त्याचा फायदा घेत दहशतवादी तेथून पसार होण्यात यशस्वी झाले, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. तसेच यावर्षी स्वातंत्र्य दिनी झालेल्या चकमकीदरम्यान उडालेल्या गोंधळात दोन महिलांना गोळ्या लागल्या होत्या. मात्र सुरक्षा दलांनी प्रसंगावधान दाखवत दोन दहशतवाद्यांना ठार मारले होते. चकमकीनंतर या दहशतवाद्यांचे मृतदेह बुरखा घातलेल्या अवस्थेत सापडले होते.  दरम्यान, याच वर्षी  फेब्रुवारी महिन्यात बुरखाधारी दहशतवाद्यांनी आपल्या सहकाऱ्याला रुग्णालयातून पळवून नेले होते.  

टॅग्स :terroristदहशतवादीTerrorismदहशतवादJammu Kashmirजम्मू-काश्मीरIndian Armyभारतीय जवान