शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

सुरक्षा दल अॅक्शन मोडमध्ये, काश्मीरप्रमाणे नक्षलग्रस्त भागातही ऑपरेशन करण्याची तयारी सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2021 13:20 IST

गृह मंत्रालयाने सांगिल्यानुसार, मागील काही वर्षात नक्षलवादी कारवायांमध्ये 70 टक्के घट झाली आहे.

नवी दिल्ली:छत्तीसगड आणि झारखंड सारख्या राज्यांच्या नक्षलग्रस्त भागात सुरक्षा दलांकडून काश्मीर सारखे ऑपरेशन्स केले जाणार आहे. सीआरपीएफ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पावसाळा संपल्यानंतर उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी बाधित भागात मोठ्या कारवाईला मंजुरी दिली आहे. पावसाळ्यात ऑपरेशन करणे धोकादायक होते आणि मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता होती. त्यामुळे सुरक्षा दल पावसाळा संपण्याचीच वाट पाहत होते.

सीआरपीएफच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर एका वृत्त वाहिनीलाला सांगितले की, “पावसाळयाचा हंगाम संपल्यामुळे आता मोठ्या प्रमाणात नक्षलविरोधी विशेष दल(COBRA) आणि प्रभावित क्षेत्राच्या प्रमुखांना नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई करण्यासाठी संदेश पाठवला आहे. या कारवाया काश्मीरमध्ये केल्या जातात त्याच पद्धतीने चालू राहतील. मोहिमेत लवकरच अनेक मोठ्या कारवाया केल्या जाणार आहेत.

दुसरीकडे, नक्षलग्रस्त भागात तैनात असलेल्या आयटीबीपी आणि सीआयएसएफसारख्या इतर निमलष्करी दलांनाही नक्षलवाद्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यास आणि कारवाई करण्यास सांगितले आहे. त्याचप्रमाणे केंद्राचे उच्च अधिकारीही या रेड झोन भागांना भेट देतील आणि सुरक्षा दलांच्या सज्जतेची चाचणी घेतील. केंद्र सरकारच्या इराद्याबाबत स्थानिक पोलिसांनाही कळवण्यात आले आहे.

नक्षलवादी घटनांमध्ये घटया वर्षाच्या सुरुवातीला गृह मंत्रालयाने संसदेत सांगितले होते की, नक्षली घटना 70 टक्क्यांनी कमी झाल्या आहेत. 2009 मध्ये 2,258 घटना घडल्या होत्या, तर 2020 मध्ये त्यांची संख्या 665 वर आली आहे. मंत्रालयाने आपल्या निवेदनात म्हटले होते की, सामान्य नागरिक आणि सुरक्षा दलातील जवानांच्या मृत्यूच्या घटनांमध्येही 82 टक्क्यांनी घट झाली आहे. 2010 मध्ये अशा प्रकरणांची संख्या 1,005 होती, ती 2020 मध्ये 183 वर आली आहे.

  

टॅग्स :naxaliteनक्षलवादीChhattisgarhछत्तीसगडSoldierसैनिक