शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

सरन्यायाधीशांनी घेतली सुरक्षेची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2019 07:34 IST

मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांशी चर्चा; एक तास बैठक

नवी दिल्ली : राजकीयदृष्ट्या अतिशय संवेदनशील असलेल्या रामजन्मभूमी प्रकरणाच्या खटल्याचा निकाल सर्वोच्च न्यायालय पुढील आठवड्यात देण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी उत्तर प्रदेशचे मुख्य सचिव व पोलीस महासंचालकांकडून त्या राज्यातील सुरक्षाव्यवस्थेची शुक्रवारी एका बैठकीदरम्यान माहिती घेतली.

सरन्यायाधीशांच्या दालनात सुमारे एक तास ही बैठक सुरू होती. उत्तर प्रदेशातील कायदा व सुव्यवस्थेची स्थिती सुरळीत राहाण्यासाठी कडेकोट सुरक्षा ठेवण्यात आली आहे असे त्या राज्याचे मुख्य सचिव राजेंद्रकुमार व पोलीस महासंचालक ओमप्रकाश सिंह यांनी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांना सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली. या बैठकीत आणखी कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली याचा तपशील मात्र कळू शकलेला नाही. रामजन्मभूमी खटल्यात सलग ४० दिवस सुनावणी झाल्यानंतर त्याचा निकाल १६ आॅक्टोबरपर्यंत राखून ठेवण्यात आला होता. सरन्यायाधीश रंजन गोगोई १७ नोव्हेंबर रोजी निवृत्त होत असून त्याआधीच ते या वादग्रस्त प्रकरणाच्या खटल्याचा निकाल देणार आहेत.दोन हेलिकॉप्टर सज्जच्रामजन्मभूमी खटल्याच्या निकालाच्या आधी व नंतर उत्तर प्रदेशमध्ये कोणत्याही अनुचित घटना घडू नयेत यासाठी सुरक्षाव्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे.च्त्याचाच भाग म्हणून सुरक्षादलांच्या तातडीच्या मदतीसाठी लखनऊ व अयोध्या याठिकाणी दोन हेलिकॉप्टर सज्ज ठेवण्यात आली आहेत. ही माहिती मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ दिली. त्यांनीराज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी व आयएएस अधिकाऱ्यांशी गुरुवारी रात्री व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधून सुरक्षाव्यवस्थेचा आढावा घेतला. कायदा हातात घेणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा योगी आदित्यनाथ यांनी दिला आहे.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयRanjan Gogoiरंजन गोगोई