शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

माध्यमिक शिक्षण ९ वी ते १२वीपर्यंत एकत्रित; स्तर रचना पुन्हा बदलणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2019 06:20 IST

नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा मसुदा शुक्रवारी नवे मनुष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरियाल यांना सादर करण्यात आला.

विनोद ताजने वणी (यवतमाळ) : सर्व शिक्षण अभियानाने सुरू केलेली शैक्षणिकस्तर रचना मोडीत काढून त्याऐवजी ५+३+३+४ ही नवी स्तर रचना सुरू करण्याची शिफारस शैक्षणिक धोरण २०१९ मध्ये करण्यात आली आहे. ही शिफारस अंमलात आली तर माध्यमिक शिक्षण ९ वी ते १२ वीपर्यंत एकत्रित होईल.

नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा मसुदा शुक्रवारी नवे मनुष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरियाल यांना सादर करण्यात आला. हा मसुदा इस्त्रोचे माजी प्रमुख के. कस्तुरीरंगन यांच्या नेतृत्वात आठ सदस्यीय समितीने तयार केला. १९८६ मध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण तयार करण्यात आले. त्यात १९९२ मध्ये वेळोवेळी दुरुस्ती करून आत्तापर्यंत या धोरणाच्या आधारेच शिक्षण प्रणाली सुरू आहे. कोठारी आयोगाने १०+२+३ अशी स्तर रचना केली होती. सर्व शिक्षा अभियानांतर्गत मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिनियम २००९ अन्वये ही स्तर रचना ५+३+२+२ अशी करण्यात आली. आता नव्या शैक्षणिक धोरणात माध्यमिक शिक्षण ९ वी ते १२ वीपर्यंत एकत्रित करण्याची शिफारस केली आहे. दहावीनंतर विविध शाखांची निवड बंद करून विद्यार्थ्यांना निवडीचे स्वातंत्र्य देण्यात आले आहे. प्रत्येक वर्गात दोन सत्र पद्धती राहील. चार वर्षांतील आठ सत्रांमध्ये विद्यार्थ्यांना गणित, विज्ञान विषयासह २४ विषय शिकणे बंधनकारक राहणार आहे. स्तर रचनेमध्ये (५+३+३+४) पाच वर्षे तसेच पूर्व प्राथमिकची ३ वर्षे अधिक पहिली व दुसरीचा समावेश आहे.

मोफत शिक्षणाची व्याप्ती वाढविलीशिक्षण अधिनियम २००९ मध्ये १४ वर्षांपर्यंत म्हणजे आठवीपर्यंतचे शिक्षण मोफत शिक्षणाच्या आवाक्यात होते. आता नव्या शैक्षणिक धोरणात बारावीपर्यंतचे शिक्षण मोफत करण्याची शिफारस आहे. तसेच सध्याचे मध्यान्ह भोजनाचे नाव बदलवून ‘पौष्टीक न्याहारी’ असे करण्यात येणार आहे.

शुल्क ठरविण्याची खासगी संस्थांना मुभानवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात राष्ट्रीय शिक्षण आयोगाची स्थापना करणे, मनुष्यबळ मंत्रालयाचे नाव शिक्षण मंत्रालय करणे, खासगी शिक्षण संस्थाच्या शुल्क वाढीला आळा घालणे या शिफारशीसुद्धा करण्यात आल्या आहे. खासगी संस्थांना त्यांचे शिक्षण शुल्क ठरविण्याचा अधिकार असेल. मात्र तो नफा मिळविण्याचा उद्देश न ठेवता करावा लागेल.

टॅग्स :Educationशिक्षण