शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

दुसऱ्या लाटेत लसीने हजारो लोकांना वाचवले; रुग्णालयात दाखल व्हायची वेळ ८० % कमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2021 06:04 IST

नवे व्हेरिएंट येतील; परंतु त्यांना रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग हा एकमेव उपाय आहे. सोबतच लसीकरणही सुरू राहिले पाहिजे.

- नितीन अग्रवाललोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : कोरोना लसीकरणामुळे देशात हजारो लोकांचे जीव वाचवण्यात यश आले आहे, असे कोरोना लढाईत सरकारचे सल्लागार आणि निति आयोगाचे सदस्य डॉ. व्ही.के. पॉल यांनी म्हटले. लस घेतलेले आरोग्य कर्मचारी रुग्णालयात दाखल होण्याची शक्यता ७५ ते ८० टक्के कमी होते, असे ते म्हणाले.

कोरोना रुग्ण आणि अति दक्षता विभागासारख्या जोखमीच्या वातावरणात काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या करण्यात आलेल्या सर्व्हेच्या हवाल्याने पॉल म्हणाले की, लस घेतल्यानंतरही संक्रमित होणाऱ्यांमध्ये फक्त आठ टक्क्यांनाच ऑक्सिजनची गरज पडली, तर अतिदक्षता विभागात फक्त सहा टक्क्यांनाच जायची वेळ आली. पॉल म्हणाले की, आकडेवारी हे सांगते की, लसीमुळे हजारो लोकांचे प्राण वाचत आहेत, म्हणून लस घेणे खूप गरजेचे आहे.

नवे व्हेरिएंट येतील; परंतु त्यांना रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग हा एकमेव उपाय आहे. सोबतच लसीकरणही सुरू राहिले पाहिजे. ५३१ जिल्ह्यांत संक्रमणाचा दर खाली येत आहे म्हणून निष्काळजी होऊन चालणार नाही, असे पॉल म्हणाले.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस