शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

दुर्लक्ष केल्यानेच देशात कोरोनाची दुसरी लाट: RSS सरसंघचालक मोहन भागवतांनी सरकारला फटकारले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2021 07:49 IST

कोरोनाच्या या गंभीर संकटाच्या काळात लोकांमध्ये सकारात्मता वाढावी, त्यांच्यात आत्मविश्वास यावा या हेतूने संघाच्या वतीने ‘पॉझिटिव्हिटी अनलिमिटेड’ ही व्याख्यानांची मालिका आयोजित केली जात आहे

नवी दिल्ली : डॉक्टरांनी वारंवार सावधानतेचा इशारा दिल्यानंतरही कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर सरकार तसेच प्रशासन आणि लोकांनीही काहीसे दुर्लक्ष केल्याने देशापुढे सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे गंभीर संकट ओढ‌वले आहे, असे स्पष्ट मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी शनिवारी व्यक्त केले. तज्ज्ञ आता देशात तिसरी लाटही येऊ शकते असे सांगत असतील तर त्याला अजिबात घाबरून न जाता तयारीने या संकटाला सामोरे जात हे युद्ध जिंकले पाहिजे, असे आवाहनही मोहन भागवत यांनी नागरिकांना केले.

कोरोनाच्या या गंभीर संकटाच्या काळात लोकांमध्ये सकारात्मता वाढावी, त्यांच्यात आत्मविश्वास यावा या हेतूने संघाच्या वतीने ‘पॉझिटिव्हिटी अनलिमिटेड’ ही व्याख्यानांची मालिका आयोजित केली जात आहे. यातील व्याख्यानात मोहन भागवत बोलत होते. या ऑनलाईन पद्धतीने आयोजित केलेल्या व्याख्यानात भागवत म्हणाले की, देशाच्या सरकार आणि लोकांनी दुर्लक्ष केल्यानेच देशात कोरोनाची दुसरी लाट भविष्याच्या विचार करून लोकांनी तसेच सरकारने सध्या सुरु असलेल्या घडामोडींमधून योग्य तो बोध घेतला पाहिजे. देशाला भेडसावत असलेल्या सगळ्या अडचणींना बाजूला सारत कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी सगळ्यांनी आत्मविश्वासाने उभे राहिले पाहिजे. 

यावेळी मोहन भागवत यांनी नागरिकांना कायम वैज्ञानिकतेचा आधार घेण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की, तुमच्यापर्यंत येणाऱ्या कोणत्याही नव्या विचाराचे वैज्ञानिकतेच्या आधारावर परीक्षण करूनच मगच त्याचा स्वीकार करा. संघाच्या वतीने ११ मे पासून या व्याख्यानांचे आयोजन केले जात आहे. शुक्रवारी आयोजित केलेल्या व्याख्यानात विप्रोचे ग्रुपचे संस्थापक अझिम प्रेमजी, आध्यात्मिक गुरु जग्गी वासुदेव यांनीही आपले विचार मांडले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMohan Bhagwatमोहन भागवत