शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Covishield चा दुसरा डोस आता १२-१६ व्या आठवड्यादरम्यान; केंद्रानं मंजूर केली वर्किंग ग्रुपची शिफारस

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2021 19:29 IST

Corona Vaccine Covishield : वर्किंग ग्रुपची शिफारस केंद्रानं केली मंजूर. १२ ते १६ आठवड्यामध्ये मिळणार लसीचा दुसरा डोस.

ठळक मुद्देवर्किंग ग्रुपची शिफारस केंद्रानं केली मंजूर. १२ ते १६ आठवड्यामध्ये मिळणार लसीचा दुसरा डोस.

Dosage interval for Covishield: देशात कोरोना लसीची प्रचंड टंचाई (Corona Vaccine Shortage) भासू लागली आहे. पहिला डोस घेतलेल्यांना दुसरा डोस घेण्यासाठी वारंवार लसीकरण केंद्राच्या (Vaccination centers) चकरा माराव्या लागत आहेत. यामुळे आधी ३० दिवसांत लसीचा दुसरा डोस घेण्यास सांगण्यात आलं होतं. परंतु नंतर सरकारनं हा कालावधी ४५ दिवसांवर नेला होता. आता या अंतरात आणखी करण्यात आली आहे. आता नागरिकांना कोविशिल्ड या लसीचा दुसरा डोस १२ ते १६ आठवड्यांदरम्यान देण्यात येणार आहे.  (The immunisation panel has recommended increasing the gap between two doses of Covishield vaccine to 12-16 weeks. No change in dosage interval for Covaxin has been suggested by the panel.) वर्किंग ग्रुपनं केलेल्या शिफारसी सरकारनं मान्य केल्या आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं यासंदर्भातील माहिती दिली. दरम्यान, कोवॅक्सिन या लसीच्या दुसऱ्या डोसचा कालावधी मात्र वाढवण्यात आला नाही. ब्रिटनमध्ये उपलब्ध रियल लाईफ एविडन्सच्या आधारे वर्किंग ग्रुपनं कोविशिल्ड या लसीच्या दोन डोसमध्ये १२ ते १६ आठवड्यांचं अंतर ठेवण्याची शिफारस केली होती. ती सरकारनं मंजूर केली आहे. परंतु कोवॅक्सिनबाबत कोणतीही शिफारस करण्यात आली नव्हती. कोवॅक्सिनच्या कालावधीत बदल नाही

केंद्र सरकारची कोरोना सल्लागार समितीने सीरम इन्स्टिट्यूट बनवत असलेली ऑक्सफर्डच्या कोविशिल्डचा दुसरा डोस देण्याचा कालावधी वाढविण्याची शिफारस केली होती. कोविशिल्डच्या दोन डोसमधील अंतर १२ ते १६ आठवड्यांनी वाढविण्यास सांगण्यात आलं होतं. सध्या कोविशिल्डच्या दोन डोसमधील अंतर हे चार ते आठ आठवड्यांचं करण्यात आलं आहे. महत्त्वाचं म्हणजे भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनच्या दुसऱ्या डोसचा कालावधी तसाच ठेवण्यात आला आहे. तो चार आठवड्यांचा आहे. ज्यांना कोरोनाची लागण झाली होती आणि जे बरे झाले आहेत त्यांनी देखील लगेचच कोरोना लस घेण्यासाठी धावाधाव करण्याची गरज नसल्याचे या वर्किंग ग्रुपनं म्हटलं आहे. अशा लोकांनी बरं झाल्यापासून सहा महिन्यांनी लस घ्यावी, असं या NTAGI ने सुचविलं होतं. गरोदर असलेल्या महिलांना कोणतीही लस निवडण्याची मुभा आहे. तसंच प्रसुती झाल्यानंतर महिला कधीही लस घेऊ शकतात, असे या त्यांनी नमूद केलं होतं. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसIndiaभारतGovernmentसरकार