शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

जिग्नेश मेवाणी आणि उमर खलिद यांच्याविरोधात मुंबईत सर्च वॉरंट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2018 13:17 IST

गुजरातमधील अपक्ष आमदार जिग्नेश मेवाणी आणि उमर खालीद यांच्याविरोधात मुंबईतील जूहू पोलिसांनी सर्च वॉरंट जारी केलं आहे. आज छात्र भारतीच्या कार्यक्रमासाठी ते मुंबईत आले होते.

मुंबई - गुजरातमधील अपक्ष आमदार जिग्नेश मेवाणी आणि उमर खालीद यांच्याविरोधात मुंबईतील जूहू पोलिसांनी सर्च वॉरंट जारी केल्याचे वृत्त आहे. आज छात्र भारतीच्या कार्यक्रमासाठी ते मुंबईत आले होते. भीमा कोरेगाव प्रकरणानंतर मुंबईसह महाराष्ट्रात झालेला हिंसाचार लक्षात घेऊन मुंबई पोलिसांनी दलित नेते जिग्नेश मेवाणी आणि उमर खालिद यांचा सहभाग असलेल्या छात्रभारती विद्यार्थी संघटनेच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारली. विलेपार्ल्याच्या भाईदास सभागृहात हा कार्यक्रम होणार होता. सध्या या परिसराला पोलीस छावणीचे स्वरुप आले आहे. 

छात्र भारतीच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी येत असताना पोलिसांनी जेएनयू छात्र नेते प्रदीप नरवाल आणि अलाहाबाद युनिव्हर्सिटी युथ विंगच्या अध्यक्षा रिचा सिंग यांना ताब्यात घेतलं आहे. सध्या इमर्जन्सी काळ सुरु आहे. हा मुद्दा आम्ही संसदेपर्यंत घेऊन जाणार आहे. ही तानाशाही सुरू आहे.  सरकारला सगळ्यात जास्त भीती विद्यार्थ्यांकडून आहे.  त्यामुळे ते घाबरत आहे अशी प्रतिक्रिया रिचा सिंग यांनी दिली. 

परवानगी नाकारल्यानंतरही कार्यक्रम घेण्यावर ठाम असलेल्या छात्रभारतीच्या कार्यकर्त्यांना अखेर पोलिसांनी उचललं आहे. विलेपार्ल्यात जमावबंदीच कलम 144 लागू करण्यात आलं आहे. पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतरही कुठल्याही परिस्थितीत हा कार्यक्रम होणारच अशी भूमिका छात्रभारतीने घेतली त्यामुळे संघर्ष झाला. जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. ही दडपशाही असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला.  

दोन महिन्यांपासून कार्यक्रमाची तयारी सुरू होती. काल पर्यंत पोलिसांनी कोणतीही ताकिद दिली नाही. कार्यक्रमाच्या पाच मिनिटांआधी कार्यक्रम रद्द करण्यास पोलिसांनी सांगितले. ते शक्य नसल्याने कार्यक्रमावर ठाम होतो. मात्र सरकारने आवाज दाबण्यासाठी पोलिसांना पुढे करून ही दडपशाही केली असे छात्रभारतीने म्हटले आहे. कार्यक्रमाचे आयोजक सचिन बनसोडे यांना अटक केली असून पोलिसाकडून १४९ ची नोटीस देण्यात आली आहे. 

टॅग्स :Jignesh Mevaniजिग्नेश मेवानीChhatra Bharatiछात्रभारती