शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

SCO Summit: पंतप्रधान नरेंद्र मोदी SCO समिटसाठी उझबेकिस्तानला रवाना, 'या' देशांच्या प्रमुखांना भेटणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2022 21:45 IST

Uzbekistan SCO Summit: उझबेकिस्तानच्या समरकंदमध्ये शांघाय शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

PM Modi Uzbekistan Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) उझबेकिस्तानला रवाना झाले आहेत. उझबेकिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांच्या निमंत्रणावरून नरेंद्र मोदी समरकंदमध्ये(Samarkand) होणाऱ्या शांघाय शिखर परिषदेत(SCO) सहभागी होतील. समरकंदला रवाना होण्यापूर्वी पंतप्रधान मोदींनी गुरुवारी एक निवेदनही जारी केले. यामध्ये पंतप्रधान म्हणाले की, ते सध्याच्या समस्या, विस्तार आणि सहकार्याबाबत विचारांची देवाणघेवाण करण्यास उत्सुक आहेत.

पंतप्रधान मोदी शुक्रवारी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन, चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग आणि इराणचे नेते इब्राहिम रायसी यांच्यासह इतर नेत्यांसह SCO च्या वार्षिक शिखर परिषदेला उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान मोदी उझबेकिस्तानचे राष्ट्रपती शवकत मिर्जियोयेव यांच्या निमंत्रणावर जात आहेत. यंदा उझबेकिस्तानमध्ये SCO आयोजित करण्यात आली आहे. SCO शिखर परिषदेत पंतप्रधान मोदी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक घेणार आहेत. याशिवाय उझबेकिस्तानचे राष्ट्रपती आणि इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक होईल. यादरम्यान, मोदी चीन आणि पाकिस्तानच्या प्रमुखांशी भेटणार आहेत की, नाही याबाबत कोणतीही माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिलेली नाही.

शुक्रवारी 16 सप्टेंबर रोजी भारतीय वेळेनुसार सकाळी 10 वाजता SCO सदस्य देशांच्या प्रमुखांची बैठक होणार आहे. पंतप्रधान मोदींचा समरकंद दौरा 24 तासांपेक्षा कमी असेल. PM मोदी उद्या रात्री 10:15 वाजता म्हणजेच 17 सप्टेंबरच्या वाढदिवसापूर्वी दिल्लीला परततील.

काय म्हणाले पीएम मोदी?PM मोदींनी रवाना होण्यापूर्वी दिलेल्या निवेदनात म्हटले की, "SCO समिटमध्ये मी सध्याच्या प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर विचारांची देवाणघेवाण, SCO चा विस्तार आणि संघटनेतील बहुआयामी आणि परस्पर फायदेशीर सहकार्य आणखी वाढवण्याची अपेक्षा करतो. व्यापार, अर्थव्यवस्था, संस्कृती आणि पर्यटन क्षेत्रात परस्पर सहकार्यासाठी उझबेक राष्ट्राध्यक्षांच्या काळात अनेक निर्णय घेतले जाण्याची अपेक्षा आहे." 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी