शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

'सिंधिया इज लेडी किलर', कल्याण बॅनर्जींच्या टीकेनंतर सभागृहात गदारोळ, निलंबनाची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2024 18:53 IST

तृणमूल खासदार कल्याण बॅनर्जी यांनी ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यावर वैयक्तिक टीका केली.

Kalyan Banerjee On Jyotiraditya Scindia:संसदेच्या हिवाळी अधिवेशनात बुधवारचा दिवसही गोंधळात गेला. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया आणि तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांच्यात जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. सिंधियावर टीका करताना बॅनर्जींनी त्यांना 'लेडी किलर' आणि 'विलेन' अशी उपमा दिली. तसेच, 'तुम्ही महाराजा आहात, म्हणून इतरांना कमी दर्जाचे समजता का?' असा खोचक सवालही केला. यावर सिंधिया चांगलेच तापले.

ज्योतिरादित्य सिंधिया चिडलेकल्याण बॅनर्जींच्या टीकेनंतर ज्योतिरादित्य संधिया चांगेलच संतापले. 'तुम्ही वैयक्तिक टीका करत आहात. माझं नाव ज्योतिरादित्य सिंधिया आहे. माझ्या कुटुंबाबद्दल वाईट बोललात, वैयक्तित टीका केली, तर मी सहन करणार नाही. सभागृहातील सर्वजण राष्ट्र उभारणीत योगदान देण्यासाठी आले आहेत. तुम्ही सरकारच्या धोरणांवर टीका करा, पण वैयक्तिक टीका खपवून घेणार नाही,' असा पलटवार सिंधियांनी यावेळी केला. 

तात्काळ मागितली माफी, पण..वाढता गदारोळ पाहून कल्याण बॅनर्जी यांनी त्यांच्या वक्तव्याबद्दल माफी मागितली, मात्र सिंधिया यांनी त्यांची माफी स्वीकारणार नसल्याचे सांगितले. कल्याण बॅनर्जी म्हणाले, 'माझा हेतू सिंधिया किंवा कुणालाही दुखावण्याचा नव्हता. मी माफी मागतो.' कल्याण बॅनर्जी यांच्या वक्तव्यानंतर सभागृहात एकच गोंधळ सुरू झाला, ज्यामुळे सभागृहाचे कामकाज सायंकाळी 5 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले.

महिला खासदारांनी केली तक्रारकल्याण बॅनर्जींच्या या वक्तव्यावरुन राजकारण तापले आहे. त्यांच्याविरोधात भाजपच्या महिला खासदारांनी संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांच्याकडे तक्रार केली आहे. कल्याण बॅनर्जी यांनी ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यावर वैयक्तिक टीका केल्याचा आरोप महिला खासदारांनी केला आहे. कल्याण बॅनर्जी यांना अधिवेशनाच्या उर्वरित भागासाठी निलंबित करण्याची मागणी महिला भाजप खासदारांनी केली आहे.

टॅग्स :ParliamentसंसदBJPभाजपाtmcठाणे महापालिकाJyotiraditya Scindiaज्योतिरादित्य शिंदे