शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

संकटं संपता संपेना! कोरोनापेक्षाही खतरनाक सुपरबगने शास्त्रज्ञांच्या चिंतेत भर; माजवू शकतो हाहाकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2021 09:16 IST

Candida Auris Superbug : कोरोनाच्या संकटाचा सामना करत असतानाच आता आणखी एक खतरनाक सुपरबग (Superbug) सापडला आहे.

कोरोना व्हायरसचा जगात हाहाकार पाहायला मिळत आहे. अनेक प्रगत देशही कोरोनापुढे हतबल झाले आहेत. रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असल्याने काही ठिकाणी अत्यंत गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. जगभरातील सर्वच देश कोरोनाचा सामना करत आहे. मात्र आता धडकी भरवणारी माहिती समोर आली आहे. कोरोनाच्या संकटाचा सामना करत असतानाच आता आणखी एक खतरनाक सुपरबग (Superbug) सापडला आहे. अंदमान आणि निकोबार बेटावर शास्त्रज्ञांना एक महाभयंकर सुपरबग आढळून आला आहे. हा मल्टी ड्रग्ज रेजिस्टन्स ऑर्गेनिज्म आहे. म्हणजेच त्याच्यावर कोणत्याच औषधांचा काहीच परिणाम होत नाही.

शास्त्रज्ञ डॉ. अर्टुरो कासाडेवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, कँडिडा ऑरिस  (Candida Auris) असं या सुपरबगचं नाव आहे. दहा वर्षांपूर्वी याचा शोध लागला होता. मात्र हा सुपरबग नेमका कुठून आला हे अद्याप काही समजलेलं नसून ते एक रहस्य असल्याचं म्हटलं जात आहे. कासाडेवाल हे जॉन्स हॉपकिन्स ब्लूमबर्ग स्कूल ऑफ पब्लिक हेल्थच्या मॉलीक्युलर मायक्रोबायोलॉडी अँड इम्युनोलॉजी विभागाचे प्रमुख आहेत. रिसर्च करणाऱ्या संशोधकांच्या टीममध्ये भारतातील काही शास्त्रज्ञांचा देखील समावेश आहे. 2009 साली जपानंमधील एका रुग्णामध्ये हा सुपरबग सापडला होता. त्यानंतर तो जगभर पसरला. 

कँडिडा ऑरिसवर उपचार करणं कठीण आहे कारण त्यावर कोणत्याच औषधांचा परिणाम होत नाही. तसेच मानवाच्या शरीरात याचा प्रसार हा वेगाने होत असतो. दिल्ली युनिव्हर्सिटीतील मेडिकल मायकोलॉजिस्ट डॉ. अनुराधा चौधरी आणि त्यांच्या टीमने अंदमान बेटाजवळील बेटे आणि भारत-म्यानमार यांच्यादरम्यानच्या बेटावरील आठ वेगवेगळ्या ठिकाणावरील माती आणि पाण्याची तपासणी केली. यामध्ये सुबरबगचे सँपल हे मल्टीड्रग रेसिसटेंट असल्याचं समोर आलं आहे, सेटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनच्या मते, कँडिडा ऑरिसमुळे रक्तासंबंधी गंभीर संसर्ग होऊ शकतो. यावर उपचार करणं कठीण आहे. 

एप्रिल 2019 मध्ये CDC ने या मायक्रोबच्या हल्ल्याची एक लिस्ट तयार केली होती. ऑस्ट्रेलिया, ऑस्ट्रिया, बेल्जियम, कॅनडा, चीन, कोलंबिया, फ्रान्स, जर्मनी, भारत, इराण, इस्रायल, जपान, केनिया, कुवैत, मलेशिया, मेक्सिको, नीदरलँड्स, नॉर्वे, ओमान, पाकिस्तान, पनामा, रशिया, सौदी अरब, सिंगापूर, साऊथ अफ्रीका, साऊथ कोरिया, स्पेन स्विर्झलँड, तैवान, यूएई, युके, अमेरिका या देशांतील लोकांना याचा संसर्ग झाला होता. यावर लस तयार करून त्याचा उंदरावर प्रयोग करण्यात आला. हा प्रयोग यशस्वी झाला. पण अद्याप या लसीची मानवी चाचणी झालेली नाही. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याandaman-and-nicobar-islands-pcअंडमान आणि नोकोबार द्वीप समूहResearchसंशोधन