शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

३१ ऑक्टोबरपर्यंत शाळा बंदच राहणार, दिल्ली सरकारचा निर्णय

By ravalnath.patil | Updated: October 4, 2020 14:10 IST

Schools in Delhi to remain shut till October 31: दिल्लीतील सर्व शाळा ३१ ऑक्टोबरपर्यंत बंद राहतील, असे निर्देश दिल्लीचे उपमुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्री मनीष सिसोदिया यांनी दिले आहेत.

नवी दिल्ली : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. तसेच, दिल्लीत सुद्धा कोरोना रुग्णांच्या संख्येत कोणतीही घट होताना दिसत नाही. अशा परिस्थितीत, अनावश्यक बाहेर पडा धोकादायक आहे. त्यामुळे दिल्ली सरकारने ३१ ऑक्टोबरपर्यंत सर्व शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्लीतील सर्व शाळा ३१ ऑक्टोबरपर्यंत बंद राहतील, असे निर्देश दिल्लीचे उपमुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्री मनीष सिसोदिया यांनी दिले आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील सर्व शाळा ३१ ऑक्टोबर बंद राहतील असे मनीष सिसोदिया यांनी रविवारी सांगितले. तसेच, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाज यांनी म्हटले आहे की, पालक म्हणून त्यांना परिस्थितीचे गांभीर्य समजते. सध्या मुलांच्या आरोग्यासंदर्भात कोणतीही जोखीम घेणे योग्य होणार नाही, असे ट्विट मनीष सिसोदिया यांनी केले आहे.

यापूर्वी दिल्ली सरकारने ५ ऑक्टोबरपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर शाळा सुरु होतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. मात्र, कोरोना संसर्गाची वाढती संख्या लक्षात घेता सरकारने पुन्हा आपला निर्णय बदलला आहे. दिल्लीतील सरकारीसह कॉर्पोरेशन, एनडीएमसी, दिल्ली कॅन्टशी संलग्न आणि खासगी शाळांना बंदीचा आदेश लागू राहील. तसेच, आता ३१ऑक्टोबरनंतरच शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येईल.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृह मंत्रालयाने पाचव्या टप्प्यात ५.० अनलॉक प्रक्रियेसंदर्भात एक मार्गदर्शक सूचना जारी केली आहे. यानंतर, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, राजस्थानसह विविध राज्यांत शाळा सुरू करण्याची तयारी सुरू झाली आहे. केंद्र सरकारने याबाबत कठोर मार्गदर्शक सूचना केली आहेत.

या मार्गदर्शक तत्त्वानुसार असे म्हटले आहे की, शाळांमधील विद्यार्थ्यांना वर्गात येण्यासाठी दबाव आणला जाणार नाही. विद्यार्थ्यांनी शाळेत जाण्यासाठी पालकांची लेखी परवानगीदेखील सर्वात महत्वाची मानली गेली आहे. याशिवाय, शाळा पूर्वीप्रमाणे ऑनलाईन वर्ग सुरू ठेवतील. 

एवढेच नाही तर केंद्र सरकारने असेही म्हटले आहे की, १५ ऑक्टोबरपासून शाळा सुरू करायच्या की नाही याबाबतचा निर्णय राज्य सरकार आपल्या राज्यातील परिस्थिती आणि तयारीनुसार घेईल. तसेच, राज्य सरकार  कोरोना संसर्गाच्या घटनांचा आढावा घेतल्यानंतरच हा निर्णय घेईल. त्यांच्यावर कोणताही दबाव नसणार आहे.

देशात गेल्या २४ तासांत कोरोनाचे ७५८२९ नवे रुग्णरविवारी (४ ऑक्टोबर) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या २४ तासांत कोरोनाचे ७५८२९ नवे रुग्ण आढळून आले होते. तर ९४० जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ६५ लाख ४९ हजारांवर पोहोचली. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा हा तब्बल एक लाखांवर पोहोचला आहे. सर्वाधिक रुग्णसंख्या असलेल्या देशांच्या यादीत भारत दुसऱ्या स्थानी आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या सातत्याने वाढत असल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. देशातील विविध रुग्णालयात रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच अनेकांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली असून त्यांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

टॅग्स :Schoolशाळाcorona virusकोरोना वायरस बातम्या