शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

शाळेच्या नाटकात गोडसे साकारणारा विद्यार्थी संघाच्या गणवेशात; फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2019 09:43 IST

स्वयंसेवकांकडून पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

भोपाळ: गांधी जयंतीला एका शाळेत सादर करण्यात आलेल्या नाटकामुळे चांगलाच गदारोळ झाला आहे. गांधींच्या जीवनावर आधारित नाटकात त्यांच्या हत्येचा प्रसंग होता. त्यात गांधींवर गोळ्या झाडणारा नथुराम गोडसेराष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गणवेशात दाखवण्यात आला. त्यामुळे संघाचे स्वयंसेवक संतप्त झाले असून त्यांनी या प्रकरणी मानहानीचा दावा दाखल करण्याची तयारी सुरू केली आहे. जबलपूरच्या एका शाळेत गांधी जयंतीला एक नाटक सादर करण्यात आलं. यामध्ये गांधीच्या आयुष्यातील अनेक घटनांचा समावेश होता. यापैकी गांधी हत्येच्या प्रसंगाचा फोटो सोशल मीडियावर आल्यानं गदारोळ झाला. नाटकात नथुराम गोडसेंची भूमिका साकारणारा विद्यार्थी संघाच्या गणवेशात होता. संघाच्या गणवेशात असलेल्या विद्यार्थ्यानं महात्मा गांधींवर गोळा झाडल्या. याप्रकरणी संघाचे पदाधिकारी असलेल्या यतिंद्र उपाध्याय यांनी स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. लॉर्डगंज पोलिसांनी संबंधित शाळेविरोधात एनसीआर दाखल केला. उपाध्याय यांनी काल जबलपूरच्या पोलीस अधीक्षक अमित सिंह यांची भेट घेतली. गांधींच्या हत्येमागे संघाचा हात होता, अशी अप्रत्यक्ष शिकवण शाळेकडून विद्यार्थ्यांना दिली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. गोडसेंना संघाच्या गणवेशात दाखवण्यात आल्यानं गुन्ह्याचा कट रचल्याचं कलम लावू शकत नसल्याचं पोलीस अधीक्षक अमित सिंह यांनी उपाध्याय यांना सांगितलं. तुम्हाला मानहानीचा दावा दाखल करायचा असल्यास स्थानिक न्यायालयात जाऊ शकता, असंदेखील सिंह म्हणाले. या प्रकरणी माध्यमांनी उपाध्याय यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी भाष्य करण्यास नकार दिला. हिंदू सेवा परिषद या उजव्या विचारसरणीच्या संघटनेच्या सदस्यांनीदेखील काल पोलीस अधीक्षकांची भेट घेत शाळा आणि शिक्षकांची तक्रार केली. 

टॅग्स :Mahatma Gandhiमहात्मा गांधीNathuram Godseनथुराम गोडसेRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ