शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
4
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
5
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
6
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
7
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
8
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
9
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
10
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
11
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
12
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
13
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
14
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
15
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
16
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
17
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
18
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
19
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
20
Astro Tips: जे पुरुष घरात झाडूने साफसफाई करतात, ते झटपट श्रीमंत होतात; कसे ते पहा!

खडाजंगी सुरूच !

By admin | Updated: December 23, 2016 05:39 IST

अतिरेक्यांना सीमापार करण्यासाठी पाकिस्तान जशी मदत करतो, त्याच प्रकारे भ्रष्ट लोकांना वाचविण्याचा प्रयत्न विरोधी पक्ष

वाराणसी : अतिरेक्यांना सीमापार करण्यासाठी पाकिस्तान जशी मदत करतो, त्याच प्रकारे भ्रष्ट लोकांना वाचविण्याचा प्रयत्न विरोधी पक्ष करताहेत, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. आता काळ्या पैशाबराबेरच काळी मनेही उघड होतील, अशी कोपरखळी त्यांनी मारली. अनेक लोक असे म्हणतात की, या मोठ्या निर्णयाच्या परिणामांबाबत मी विचार केला नव्हता. खरेतर, काही राजकीय पक्ष व नेते हे भ्रष्ट मंडळींना वाचवण्यासाठी पुढे येथील, याचा विचार मी केला नव्हता. मी या निर्णयाबाबत आनंदी आहे, असेही मोदी म्हणाले. नोटाबंदीनंतर प्रथमच आपल्या मतदारसंघात ते आले. नोटाबंदीनंतर सरकारवर टीका करणारे विरोधी पक्ष हे निगरगट्टपणे भ्रष्ट आणि अप्रामाणिक लोकांच्या बाजूने उभे आहेत, असा हल्लाबोल मोदी यांनी बनारस हिंदू विद्यापीठातील कार्यक्रमात केला. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी देशात ५० टक्के नागरिक गरीब आहेत. तिथे कॅशलेस पद्धत कितपत योग्य आहे, असा सवाल केला होता. त्यावर मोदी म्हणाले, मनमोहन सिंग यांचा हा दावा म्हणजे त्यांनीच त्यांचे प्रगतिपुस्तक उघड केल्यासारखे आहे. माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी भारतात निम्म्या गावांत वीज नसल्याने आॅनलाइनचा पर्याय यशस्वी होणार नाही, असे म्हटले होते. त्यावर मोदी म्हणाले की, कुणाच्या चुका कोण मोजत आहे? हे विजेचे खांब मी हटविले की वीज तारा मी कापल्या? राहुल यांची खिल्ली -च्पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील आरोपानंतर ‘भूकंप’ होईल, असे वक्तव्य करणारे काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांची पंतप्रधान मोदी यांनी खिल्ली उडविली. ते म्हणाले, काँग्रेसचा हा तरुण नेता भाषण देणे शिकल्याने मला आनंद झाला आहे. च्आपण बोललो तर भूकंप येईल, असे हा नेता म्हणाला. पण ते जर काही बोलले नसते तर मात्र भूकंप आला असता. मात्र, आता ते बोलले आहेत. त्यामुळे कोणत्याही भूकंपाची शक्यता नाही. आम्हालाही आत्मविश्वास आला आहे की आपत्तीचा धोका शिल्लक नाही. च्राहुल गांधी यांनी कालच असा आरोप केला होता की, गुजरातचे मुख्यमंत्री असताना मोदी यांनी सहारा आणि बिर्ला समूहाकडून पैसे घेतले होते. थट्टा करा; पण आरोपांचे उत्तर द्या बहराईच : पंतप्रधानांनी भलेही आपली थट्टा करावी; पण भ्रष्टाचाराच्या आरोपांचे उत्तर द्यावे, असे आव्हान काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी येथे केले. ‘जनआक्रोश रॅली’त राहुल म्हणाले की, आपण देशातील तरुणांना नोकऱ्यांचे आश्वासन दिले होते. त्यांना आता फसवणूक झाल्याची जाणीव होत आहे. त्याबद्दल मोदी यांनी बोलावे. गुजरातचे मुख्यमंत्री असताना मोदी यांनी सहारा व बिर्ला समूहाकडून रक्कम घेतल्याचे दस्तऐवज खरे आहेत की नाही, असा सवाल राहुल यांनी केला. नोटाबंदीवर जोरदार टीका करत ते म्हणाले की, मोदी यांनी हा निर्णय गरिबांसाठी घेतलेला नाही, तर देशातील अत्यंत श्रीमंत ५० कुटुंबांच्या मदतीसाठी घेतला. ज्या श्रीमंतांवर बँकांचे आठ लाख कोटी रुपयांचे कर्ज आहे त्यांना मदत करण्यासाठी मोदींनी गरिबांकडून पैसा घेण्याची एक परिपूर्ण योजना तयार केली आहे. गरिबांकडून पैसा शोषून घेणे आणि तो श्रीमंतांना देणे, हे नोटाबंदीचे सार आहे. काँग्रेस भ्रष्टाचाराचा समूळ नायनाट करू इच्छिते. एनडीए याबाबत कोणतेही पाऊल उचलत असेल तर, त्याला आम्ही पूर्ण पाठिंबा देऊ. पण, नोटाबंदी भ्रष्टाचार व काळ्या पैशांविरुद्ध नाही, असे सांगून राहुल म्हणाले की, बँकांच्या रांगेत उभे लोक चोर आहेत, असे मोदी सांगतात. पण ते चोर नाहीत; प्रामाणिक लोक आहेत. पंतप्रधान विमानाने विदेशात जातात, तेव्हा सोबत सुटाबुटात दिसणाऱ्या लोकांसारखी एकही व्यक्ती या रांगांत नसते. (वृत्तसंस्था)सहाराच्या पाकिटातून काय मिळाले?मोदी यांच्यावर हल्लाबोल करताना राहुल यांनी ट्विट केले की, सहाराच्या दहा पाकिटांतून काय मिळाले होते, हे आम्हाला सांगा? त्यांनी एक दस्तऐवजही पोस्ट केला. हा प्राप्तिकर विभागाचा दस्तऐवज असल्याचे सांगण्यात येते. आॅक्टोबर २०१३ ते फेबु्रवारी २०१४पर्यंत मोदी यांना मिळालेल्या रकमेच्या नोंदी यात आहेत. अनेक उद्योग बंदराहुल म्हणाले की, दोन वर्षांत ६० टक्के संपत्ती एक टक्का लोकांकडे गेली आहे. निवडणुकीत ज्यांनी मदत केली त्यांच्याकडून कर्जवसुली केली जात नाही. आश्वासनांबाबत लोक विचारणा करू लागले, तेव्हा काळ्या पैशांवर सर्जिकल स्ट्राइकचे नाटक केले. मोदी यांनी दरवर्षी दोन कोटी नोकऱ्यांचा शब्द दिला होता. पण, अनेक उद्योग बंद पडत आहेत.