शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

खासगी बँकांतील घोटाळे वाढले 35 टक्क्यांनी- रिझर्व्ह बँक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2021 06:06 IST

सरकारी बँकांमधील संख्या मात्र घटली

नवी दिल्ली : सरकारी बँकांनी घोटाळ्यांना बऱ्याच प्रमाणात लगाम लावण्यात यश मिळविले असताना, आता खासगी बँकातील घोटाळ्यांचे प्रमाण वाढले आहे. वित्त वर्ष २०२०-२१ मध्ये खासगी बँकातील घोटाळ्यात तब्बल ३५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, खासगी बँकातील घोटाळ्यांची संख्या ३,०६५ वरून वाढून ३,७१० झाली आहे. या घोटाळ्यातील रकमेत तब्बल ३५.४३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मार्च २०२० अखेरीस ही रक्कम ३४,२११ कोटी होती. मार्च २०२१ रोजी ती वाढून ४६,३३५ कोटी झाली. विदेशी बँकातील घोटाळ्यातील रक्कमही ९७२ कोटी रुपयांवरून ३,३१५ कोटी रुपयांवर गेली आहे.सरकारी मालकीच्या बँकातील घोटाळ्यांची रक्कम मात्र १,४८,२२४ कोटी रुपयांवरून घसरून ८१,९०१ कोटी रुपयांवर आली आहे. सरकारी बँकातील घोटाळ्यांची संख्याही ४,४१० वरून घसरून २,९०३ वर आली आहे. सरकारी बँकातील घोटाळ्यांचे प्रमाण घटल्यामुळे एकूण बँक घोटाळ्यातील रक्कम १,८५,४६८ कोटी रुपयांवरून घसरून १,३८,४२२ कोटी रुपयांवर आली आहे. मार्च २०२० रोजी ८,७०३ असलेली एकूण घोटाळ्यांची संख्याही मार्च २०२१ मध्ये घटून ७,४६३ झाली आहे. वित्त वर्ष २०२०-२१ मध्ये एकूण बँक घोटाळ्यातील संख्या १५ टक्क्यांनी, तर घोटाळ्यात अडकलेली रक्कम २५ टक्क्यांनी घसरली आहे.कर्ज खात्यांमध्येच सर्वाधिक घोटाळे रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीनुसार, बँकातील बहुतांश घोटाळे कर्ज खात्यात होताना दिसून येत आहे. कर्ज खात्यातील घोटाळ्यांचे प्रमाण ९९ टक्के असून, त्यात १,३७,०२३ कोटी रुपये अडकले आहेत. कार्ड आणि इंटरनेट घोटाळे १२९ कोटी रुपयांवरून घसरून ११९ कोटी रुपयांवर आले आहेत.