शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

पीएम किसान सन्मान निधीमध्ये गडबड-घोटाळा, रजिस्ट्रेशन न करताच खात्यात येताहेत पैसे

By बाळकृष्ण परब | Updated: December 16, 2020 11:30 IST

PM Kisan Sanman Nidhi News : गरीब, अल्पभूधारक शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीच्या कामात मदत व्हावी, यासाठी केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री किसान सन्मान योजना सुरू करण्यात आली होती.

ठळक मुद्देप्रधानमंत्री किसान सन्मान योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात वर्षाला सहा हजार रुपये हे तीन हप्त्यांमध्ये पाठवले जातातया योजनेमध्ये गडबड-घोटाळा होत असल्याच्या बातम्या वारंवार येत असतातआता तर ज्यांनी या योजनेसाठी नोंदणी केली नाही, अशा लोकांच्या खात्यातही या योजनेचे पैसे जमा होत असल्याचे समोर आले आहे

नवी दिल्ली - गरीब, अल्पभूधारक शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीच्या कामात मदत व्हावी, यासाठी केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री किसान सन्मान योजना सुरू करण्यात आली होती. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात वर्षाला सहा हजार रुपये हे तीन हप्त्यांमध्ये पाठवले जातात. मात्र या योजनेमध्ये गडबड-घोटाळा होत असल्याच्या बातम्या वारंवार येत असतात. अनेक ठिकाणी अपात्र लोकांच्या खात्यात पैसे जमा होतात. आता तर ज्यांनी या योजनेसाठी नोंदणी केली नाही, अशा लोकांच्या खात्यातही या योजनेचे पैसे जमा होत असल्याचे समोर आले आहे.मनी कंट्रोलमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका वृत्तानुसार पीएम किसान सन्मान योजनेंतर्गत UIDAI आणि TRAI चे माजी प्रमुख असलेल्या रामसेवक शर्मा यांच्या बँक खात्यामध्ये यावर्षी पीएम किसान सन्मान योजनेमधून तीन हप्त्यांमध्ये पैसे जमा झाले आहेत. मात्र शर्मा यांनी या योजनेसाठी आपल्या नावाची नोंदणी केली नव्हती. मी या योजनेचा लाभ घेण्यासाठी कुठेही नोंदणी केलेली नव्हती. तरीही माझ्या नावाची नोंद झाली आहे. याची जबाबदारी राज्य सरकारची आहे. राज्य सरकाने ओळख न पटवता खाते पात्र कसे ठरवले, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.शर्मा यांनी सांगितले की, पीएन किसान सन्मान निधी योजनेंतर्गत माझ्या बँक खात्यात प्रत्येकी दोन हजार रुपये तीन वेळा पाठवण्यात आले. शर्मा यांच्या नावाने हे खाते ८ जानेवारी रोजी उघडण्यात आल होते. तसेच ते सुमारे नऊ महिने अ‍ॅक्टिव्ह होते. अखेर २४ सप्टेंबर रोजी हे खाते डिअ‍ॅक्टिव्हेट झाले. उत्तर प्रदेशमधील फिरोझाबाद जिल्ह्यात एक शेतकरी म्हणून माझे नाव रजिस्टर झाले होते. दरम्यान, याची माहिती मिळाल्यानंतर मी याबाबत बँकेला कळवले आहे. मात्र त्याचे अद्याप उत्तर मिळालेले नाही. मी या योजनेचा लाभ घेण्यास अपात्र आहे कारण मी प्राप्तिकर भरतो, असे त्यांनी सांगितले.अभिनेता भगवान हनुमान, आयएसआय गुप्तहेर महबूब अख्तर आणि अभिनेता रितेश देशमुख यांच्या नावानेसुद्धा पीएम किसान योजनेची खाती बनली आहेत. त्यांची आधारकार्ड उपलब्ध आहेत. हनुमानच्या खात्यात सहा हजार, महबूब अख्तरच्या खात्यात चार हजार तर रितेश देशमुखच्या खात्यात या योजनेचे दोन हजार रुपये जमा करण्यात आले आहेत.

टॅग्स :PM Kisan Schemeप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनाMONEYपैसाfraudधोकेबाजी