शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

Corona Vaccination: लसधाेरण मनमानी! सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे; केंद्र सरकारने हिशेब द्यावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2021 08:26 IST

Corona Vaccination: केंद्र सरकारने लस धोरणाचा आढावा घ्यावा व ३१ डिसेंबरपर्यंत देशात कोरोना लसींचे किती डोस उपलब्ध होतील याची माहिती द्यावी,  असाही आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.

नवी दिल्ली : देशात ४५ वर्षांहून अधिक वयाच्या लोकांना मोफत लस व १८ ते ४४ वर्षे वयोगटातील लोकांनी लसीसाठी पैसे मोजायचे हे केंद्र सरकारचे धोरण अतार्किक व मनमानी स्वरूपाचे आहे असे ताशेरे सर्वोच्च न्यायालयाने ओढले आहेत. ग्रामीण भागात लसींचा अपुरा पुरवठा होत असल्याबद्दलही न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. केंद्र सरकारने लस धोरणाचा आढावा घ्यावा व ३१ डिसेंबरपर्यंत देशात कोरोना लसींचे किती डोस उपलब्ध होतील याची माहिती द्यावी,  असाही आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.डिसेंबरपर्यंत देशभरात लसीकरण मोहीम पूर्ण करू, असे केंद्राने सर्वोच्च न्यायालयाला सांगितले होते. सर्वोच्च न्यायालयाचे न्या. धनंजय चंद्रचूड, न्या. एस. रवींद्र भट, न्या. एल. एन. राव यांच्या खंडपीठाने केंद्राला सोमवारी दिलेल्या आदेशात म्हटले की, देशात कोरोना लसींच्या किमतीमध्ये खूपच फरक  आहे. या लसींची देशात व विदेशात किंमत किती आहे याची सविस्तर माहिती सादर करावी. १८ ते ४४ वर्षे वयोगटातील लोकांना चढ्या किमतीने लसी विकत घ्याव्या लागत आहेत, अशी टीका झाली होती. अमेरिकेसह अनेक देशांनी आपल्या नागरिकांना मोफत लस दिली आहे. या गोष्टीची सर्वोच्च न्यायालयाने दखल घेतली. वयोगटांचा प्राधान्यक्रम निश्चित करान्यायालयाने म्हटले आहे की, कोरोना संसर्गाचे बदलते स्वरूप लक्षात घेता १८ ते ४४ वर्षे वयोगटातील लोकांनाही लस देण्याची आवश्यकता आहे. शास्त्रीय पद्धतीने विविध वयोगटांसाठी प्राधान्यक्रम निश्चित केला पाहिजे. कोरोना लसींच्या किमती केंद्रासाठी, राज्यांसाठी व खासगी रुग्णालयांसाठी वेगवेगळ्या आहेत. त्यावरही सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे ओढले.लसीकरणात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर देशात सर्वाधिक लसीकरण करण्याबाबत महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आहे.  कोरोना लसींच्या पुरवठ्यावरून केंद्र व राज्य सरकार यांच्यात जुंपलेली असताना, खाजगी रुग्णालयांनी त्यांच्यासाठी असलेल्या कोरोना लसींच्या २५ टक्के साठ्यापेक्षा कमी डोस विकत घेतले आहेत. मे महिन्यामध्ये उत्पादित झालेल्या कोरोना लसींपैकी राज्यांनी आपल्या २५ टक्के साठ्यापेक्षा जास्त डोसची खरेदी केली आहे.विदेशी लसींसाठी चाचण्यांची अट नाहीब्रिटन, युरोपीय देश, अमेरिका, जपान यांनी मान्यता दिलेल्या तसेच जागतिक आरोग्य संघटनेने आपत्कालीन वापरासाठीच्या यादीत समाविष्ट केलेल्या लसींच्या भारतात मानवी चाचण्या करण्याची आवश्यकता आता उरलेली नाही.अशा चाचण्यांकरिता असलेली अट आता केंद्र सरकारने रद्द केली आहे.लसींचा तुटवडा जाणवत असल्याने विदेशातूनही कोरोना लसींची मोठ्या प्रमाणावर आयात करणे आवश्यक बनले होते, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.दुसऱ्या लाटेने शिखर गाठल्याचा केंद्राचा दावा देशातील निम्म्या भागात कोरोना संसर्गाचे प्रमाण पाच टक्क्यांहून कमी आहे. त्यामुळे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कळस गाठण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे, हेच यातून दिसून येते, असा दावा केंद्र सरकारने केला आहे. ३५० जिल्ह्यांत म्हणजे देशाच्या निम्म्या भागात संसर्गाचे प्रमाण ५ टक्क्यांहून कमी आहे.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयCorona vaccineकोरोनाची लस