शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

दोन वादग्रस्त ट्विटबद्दल वकील प्रशांत भूषण ‘कन्टेम्प्ट’चे दोषी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2020 03:00 IST

न्यायालयाचा अवमान; सुप्रीम कोर्ट २० ऑगस्टला शिक्षा सुनावणार; सहा महिन्यांपर्यंत होऊ शकते शिक्षा

नवी दिल्ली : लोकशाही व मानवी हक्कांसाठी झगडणारे अनुभवी वकील प्रशांत भूषण यांनी सध्याचे सरन्यायाधीश न्या. शरद बोबडे व याआधीच्या चार सरन्यायाधीशांसह एकूणच सर्वोच्च न्यायालयाच्या कामकाजाबद्दल जूनमध्ये टिष्ट्वटरवरून केलेल्या वादग्रस्त भाष्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी भूषण यांना फौजदारी स्वरूपाच्या न्यायालयीन अवमानाबद्दल (कन्टेम्प्ट आॅफ कोर्ट) दोषी ठरविले.भूषण यांनी अनुक्रमे २७ व २९ जून रोजी केलेल्या या टष्ट्वीटस्ची स्वत:हून दखल घेत न्या. अरुण मिश्रा, न्या. भूषण गवई व न्या. कृष्ण मुरारी यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला. या प्रमादाबद्दल काय शिक्षा द्यायची, यावर न्यायालय येत्या २० आॅगस्ट रोजी भूषण यांचे म्हणणे ऐकून घेईल व नंतर शिक्षा जाहीर करील. कायद्यानुसार या प्रमादासाठी सहा महिन्यांपर्यंत कैद व दोन हजार रुपयांपर्यंत दंड, अशी शिक्षा दिली जाऊ शकते.खंडपीठाने टिष्ट्वटर कंपनीसही अवमानकारक म्हणून नोटीस काढली होती; परंतु आमची भूमिका केवळ मध्यस्थाची असते व आमच्या सेवेवर कोण काय टष्ट्वीट करतो यावर आमचे काही नियंत्रण नसते, हा कंपनीचा बचाव न्यायालयाने मान्य केला. शिवाय न्यायालयाने नोटीस काढताच कंपनीने दोन्ही संबंधित टष्ट्वीट लगेच निलंबित केले, याचीही दखल घेत खंडपीठाने कंपनीवरील प्रस्तावित कारवाई रहित केली.भूषण यांचे एक टष्ट्वीट सरन्यायाधीश न्या. बोबडे यांच्याविषयी होते. न्यायालयाच्या उन्हाळी सुटीत न्या. बोबडे नागपूरला गेले असता तेथे ते महागड्या ‘हर्ले डेव्हिडसन’ मोटारसायकलवर बसल्याचे छायाचित्र शोशल मीडियात व्हायरल झाले होते. त्यासंदर्भात भूषण यांनी केलेल्या टष्ट्वीटचा आशय असा होता की, सुप्रीम कोर्टात ‘लॉकडाऊन’ करून नागरिकांना त्यांच्या हक्कांसाठी न्यायाचे दरवाजे बंद केले गेले असताना सरन्यायाधीश मात्र श्रीमंती मजा मारत आहेत. त्यांचे दुसरे टष्ट्वीट सर्वोच्च न्यायालयाच्या एकूणच कामकाजाबद्दल होते. त्याचा आशय असा होता की, भारतात लोकशाहीला कोणी सुरुंग लावला याची इतिहासकार जेव्हा भविष्यात नोंद घेतील तेव्हा त्यात त्यांना सर्वोच्च न्यायालयाने आणि खासकरून या आधीच्या चार सरन्यायाधीशांनी बजावलेल्या भूमिकेची मुख्यत्वे दखल घ्यावी लागेल.न्यायसंस्थेवरील असा विखारी हल्ला कठोरतेने हाताळला नाही, तर त्याने एक देश म्हणून भारताच्या प्रतिष्ठेला व सन्मानाला कमीपणा येईल. निर्भीड आणि निष्पक्ष न्यायसंस्था हा कोणत्याही सुदृढ लोकशाहीचा आत्मा असतो. अशा दुर्भावनापूर्ण हल्ल्याने या संस्थेवरील विश्वासाला तडा जाऊ दिला जाऊ शकत नाही. -सर्वोच्च न्यायालय

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय