शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

सावित्रीबाई फुले विद्यापीठास मिळाली अव्वल स्वायत्तता;आणखी १२ दर्जेदार संस्थांनाही मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2018 01:26 IST

‘नॅक’कडून ज्यांना उच्च दर्जा देण्यात आला आहे अशा देशभरातील ६० उच्च शिक्षण संस्थांना विद्यापीठ अनुदान आयोगाने मंगळवारी स्वायत्तता बहाल केली. यात महाराष्ट्रील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासह आठ अभिमत विद्यापीठे व ४ महाविद्यालयांचा समावेश आहे.

नवी दिल्ली: ‘नॅक’कडून ज्यांना उच्च दर्जा देण्यात आला आहे अशा देशभरातील ६० उच्च शिक्षण संस्थांना विद्यापीठ अनुदान आयोगाने मंगळवारी स्वायत्तता बहाल केली. यात महाराष्ट्रील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासह आठ अभिमत विद्यापीठे व ४ महाविद्यालयांचा समावेश आहे.‘नॅक’ने दिलेल्या मानांकनानुसार उच्च शिक्षण संस्थांना ‘वर्ग १’ आणि ‘वर्ग २’ अशा दोन वर्गांत श्रेणीनिहाय स्वायत्तता देण्याची नियमावली विद्यापीठ आनुदान आयोगाने १२ फेब्रुवारी रोजी जाहीर केली होती. त्या निकषांनुसार आयागाने या ६० उच्च शिक्षण संस्थांची निवड केली आहे, असे सांगून केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी या संस्थांची यादी पत्रकार परिषदेत जाहीर केली. राज्यांच्या कायद्याने स्थापन झालेल्या देशभरातील एकूण २१ विद्यापीठांना अशी स्वायतत्ता मिळाली असून त्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे राज्यातील एकमेव विद्यापीठ आहे. ‘नॅक’च्या मानांकनात या विद्यापीठाचा चौथा क्रमांक असून त्यानुसार त्याला ‘वर्ग १’ ची स्वायत्तता देण्यात आली आहे.स्वायत्तता मिळालेल्या देशभरातील एकूण २४ अभिमत विद्यापीठांमध्ये सर्वाधिक आठ अभिमत विद्यापीठे महाराष्ट्रातील आहेत. ही अभिमत विद्यापीठे अशी: होमी भाभा नॅशनल इन्स्टिट्यूट, मुंबई; नरसी मोनजी इन्स्टिट्यूट, मुंबई; डॉ. डी. वाय पाटील विद्यापीठ, पुणे; सिम्बॉयसिस इंटरनॅशनल, पुणे; इन्स्टिट्यूट आॅफ केमिकल टेक्नॉलॉजी, मुंबई; दत्ता मेघे इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्सेस, वर्धा; टाटा इन्स्टिट्यूट आॅफ सोशल सायन्सेस, मुंबई; (सर्व वर्ग १) आणि पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, नवी मुंबई (वर्ग २). याखेरीज राज्यातील ज्या चार महाविद्यालायांना स्वायत्तता मिळाली आहे त्यांत यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट आॅफ सायन्स, कोल्हापूर; विवेकानंद कॉलेज, कोलहापूर; जयहिंद कॉलेज, मुंबई आणि श्री विलेपार्ले केळवणी मंडळाचे मिठीबाई आर्ट््स कॉलेज, मुंबई यांचा समावेश आहे.स्वायत्तता नेमकी कशाचीमंत्री जावडेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार स्वायत्तता मिळाल्यावरही या सर्व संस्था विद्यापीठ अनुदान आयोगाच्या कार्यकक्षेतच राहतील मात्र नवे अभ्यासक्रम, कॅप्पसबाह्य केंद्रे, कौशल्य विकास अभ्यासक्रम, रिसर्च पार्क इत्यादी सुरु करण्याची त्यांना स्वायत्तता असेल. तसेच या संस्था परदेशी अध्यापक नेमू शकतील, परदेशी विद्यार्थ्यांना प्रवेश देऊ शकतील, अध्यापकांना प्रोत्साहनपर वाढीव वेतन देऊ शकतील, अन्य संस्थांशी शैक्षणिक सहकार्य करू शकतील व दूरस्थ शिक्षण कार्यक्रम राबवू शकतील. स्वायत्तता मिळालेल्या महाविद्यालयांनाही अशाच प्रकारचे स्वातंत्र्य मिळणार असले तरी तेथील विद्यार्थ्यांना पदव्या मात्र संबंधित विद्यापीठांकडून दिल्या जातील.

टॅग्स :universityविद्यापीठ