शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
2
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
3
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
4
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
5
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
6
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
7
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
8
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
9
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
10
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
11
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
12
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
13
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
14
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
15
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
16
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
17
Pahalgam Terror Attack : काश्मीर ट्रिपसाठी साठवलेले पैसे; ९ वर्षांच्या मुलासमोरच दहशतवाद्यांनी वडिलांवर झाडली गोळी
18
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
19
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
20
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले

अपक्ष निवडणूक लढवतेय देशातील सर्वात श्रीमंत महिला; मुलगा प्रचारापासून लांब तर सून मैदानात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2024 18:31 IST

Savitri Jindal : नवीन जिंदाल हे सावित्री जिंदाल यांच्या प्रचारापासून दूर आहेत. मात्र, त्यांची पत्नी शालू जिंदाल या सावित्री जिंदाल यांच्या प्रचारासाठी निवडणुकीच्या मैदानात उतरल्या आहेत.

Haryana Assembly Elections 2024 : नवी दिल्ली : हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले आहे. अशातच देशातील सर्वात श्रीमंत महिला सावित्री जिंदाल हरियाणा विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत. त्या भाजप खासदार नवीन जिंदाल यांच्या आई आहेत.

दरम्यान, नवीन जिंदाल हे सावित्री जिंदाल यांच्या प्रचारापासून दूर आहेत. मात्र, त्यांची पत्नी शालू जिंदाल या सावित्री जिंदाल यांच्या प्रचारासाठी निवडणुकीच्या मैदानात उतरल्या आहेत. शालू जिंदाल या आपल्या सासूसाठी मतं मागत आहेत. तसेच, नवीन जिंदाल यांची मुलेही प्रचारात उतरली आहेत.

भाजपचे खासदार नवीन जिंदाल हिसार सोडून कुरुक्षेत्रमध्ये भाजप उमेदवाराचा प्रचार करत आहेत. नवीन जिंदाल हे कुरुक्षेत्रचे खासदार आहेत आणि यंदाच्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी आम आदमी पार्टीचे (आप) सुशील गुप्ता यांचा २९ हजारांहून अधिक मतांनी पराभव केला. आत्तापर्यंत काँग्रेससोबत असलेले नवीन जिंदाल लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये दाखल झाले होते. त्यांच्यासोबत त्यांची आई सावित्री जिंदाल यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला होता.

का अपक्ष म्हणून मैदानात उतरल्या?हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी सावित्री जिंदाल या हिसारमधून मैदानात उतरल्या आहेत. या निवडणुकीत त्यांना भाजपकडून तिकीट मिळाले नाही. नुकतेच त्यांनी सांगितले होते की, अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपने कितीही समजवण्याचा प्रयत्न केला तरी मान्य करणार नाही. तसेच, कोणत्याही पक्षाने निवडणुकीसाठी तिकीट दिले नाही, त्यामुळे आपण अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे, सावित्री जिंदाल यांनी सांगितले होते. त्यामुळे अशा परिस्थितीत भाजप खासदार नवीन जिंदाल यांना आपल्या आईच्या प्रचारापासून लांब राहावे लागले आहे. 

मुलासोबत राजकारणावर चर्चा होते का?सावित्री जिंदाल सध्या निवडणूक प्रचारात व्यस्त आहेत. सावित्री जिंदाल यांनी अलीकडेच सांगितले होते की, मुलगा नवीन जिंदाल यांच्याशी त्या दररोज बोलतात, परंतु राजकारणाच्या विषयावर दोघांमध्ये फारच कमी चर्चा होते.

देशातील सर्वात श्रीमंत महिला; २.७७ लाख कोटींची संपत्तीहिसारमधून निवडणूक लढवणाऱ्या सावित्री जिंदाल या देशातील सर्वात श्रीमंत महिला आहेत. सावित्री जिंदाल या जिंदाल ग्रुपच्या अध्यक्षा आणि स्टील किंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिवंगत ओपी जिंदाल यांच्या पत्नी आहेत. फॉर्च्यून इंडियाच्या अहवालानुसार, सावित्री जिंदाल या २.७७ लाख कोटी रुपयांच्या मालमत्तेच्या मालकीन आहेत.

८ ऑक्टोबरला मतमोजणीहरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील सर्व ९० जागांसाठी ५ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. तर ८ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. हरियाणासोबतच जम्मू-काश्मीर विधानसभेसाठीही मतदान सुरू असून आतापर्यंत ३ पैकी २ टप्प्यात मतदान झाले आहे. 

टॅग्स :Savitri Jindalसावित्री जिंदालHaryanaहरयाणाElectionनिवडणूक 2024