श्री विजयपूरम : स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी देशात अस्पृश्यता निर्मूलनासाठी केलेल्या कार्याचे योग्य श्रेय त्यांना कधीच देण्यात आले नाही, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शुक्रवारी सांगितले. सावरकर यांच्या ‘सागरा प्राण तळमळला’ या प्रख्यात गीताच्या लेखनाला ११५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त अंदमानमधील श्रीविजयपूरम येथे आयोजिलेल्या कार्यक्रमात त्यांनी हे उद्गार काढले.
शाह म्हणाले की, सावरकरांनी हिंदू समाजातील चुकीच्या प्रथांविरोधात धैर्याने लढा दिला. अस्पृश्यता निर्मूलनासाठी त्यांनी मोठे कार्य केले. अंदमानातील सेल्युलर जेल हे सर्व भारतीयांसाठी एक तीर्थस्थळ बनले आहे. व्हॅल्यूएबल ग्रुपचे संस्थापक अमेय हेटे, ‘मेराक इव्हेंटस’चे मंजिरी हेटे, प्रसाद महाडकर यांचीसुद्धा यावेळी उपस्थिती होती.
विनम्रता, निष्कलंक समर्पण आणि मूर्तिमंत सौजन्य
आता देशासाठी जगण्याची वेळ आली आहे : सरसंघचालक मोहन भागवत देश हा सर्वोच्च स्थानी आहे तसेच प्रत्येक व्यक्ती महत्वाचा आहे. देशाला आता बलिदान नको तर देशासाठी जगण्याची वेळ आली आहे असे रा. स्व. संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी सांगितले. या देशाचे तुकडे होतील अशी भाषा कोणीही वापरू नये. महान राष्ट्र उभारायचे असेल तर स्वातंत्र्यवीर सावरकरांचे संदेश जनतेपर्यंत पोहोचवले पाहिजेत, असे ते म्हणाले.
‘६०० हून अधिक नवीन शब्दांची केली निर्मिती’
अमित शाह यांनी सांगितले की, स्वातंत्र्यवीर सावरकर हे देशभक्त, दूरदर्शी नेते, समाजसुधारक, कवी, लेखक होते.
ते महान भाषाशास्त्रज्ञही बनले. त्यांनी ६०० हून अधिक नवीन शब्दांची निर्मिती करून आपल्या भाषेला समृद्ध केले.
Web Summary : Amit Shah stated Savarkar wasn't credited for his work eradicating untouchability. He fought Hindu societal malpractices and significantly contributed to this cause. Shah spoke at an event marking 115 years of Savarkar's famous song. Mohan Bhagwat emphasized national unity, urging people to embrace Savarkar's messages.
Web Summary : अमित शाह ने कहा कि सावरकर को अस्पृश्यता उन्मूलन के उनके काम का श्रेय नहीं मिला। उन्होंने हिंदू सामाजिक कुरीतियों के खिलाफ लड़ाई लड़ी और इस कार्य में महत्वपूर्ण योगदान दिया। शाह ने सावरकर के प्रसिद्ध गीत के 115 वर्ष पूरे होने पर एक कार्यक्रम में बात की। मोहन भागवत ने राष्ट्रीय एकता पर जोर दिया, लोगों से सावरकर के संदेशों को अपनाने का आग्रह किया।