शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

धरणं धरलं अन् आरोग्यमंत्र्यांचं आरोग्य बिघडलं, रुग्णालयात दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2018 11:19 IST

गेल्या सात दिवसांपासून धरणे आंदोलन करत असलेले दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांची तब्येत बिघडली आहे. त्यांना रविवारी रात्री रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ठळक मुद्देआरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांची तब्येत बिघडलीएलएनजेपी रुग्णालयात दाखलआंदोलनाचा आजचा आठवा दिवस

नवी दिल्ली : गेल्या सात दिवसांपासून धरणे आंदोलन करत असलेले दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांची तब्येत बिघडली आहे. त्यांना रविवारी रात्री रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांच्या कार्यालयात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकारी धरणे आंदोलन करत आहे. त्यांच्या आंदोलनाचा आजचा आठवा दिवस आहे. मात्र. या आंदोलनात सहभागी झालेले आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांची रविवारी रात्री तब्येत बिघडली. त्यांना एलएनजेपी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  यावेळी डॉक्टरांनी सांगितले की, सत्येंद्र जैन यांच्या तब्येतीत चांगली सुधारणा होईपर्यंत त्यांना रुग्णालयातच थांबावे लागणार आहे. सध्या त्यांना ग्लुकोज देण्यात येत आहे.मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह बाकीच्या मंत्र्यांचे दैनंदिन रुटिन चेकअप सुरु आहे. रविवारी सकाळपासून सत्येंद्र जैन यांची तब्येत खालवली होती. तपासणी केली त्यावेळी त्यांचे वजन 78.5 किलो असल्याची नोंद होती. दरम्यान, सत्येंद्र जैन यांना रुग्णालयात दाखल केल्याची माहिती मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सुद्धा ट्विटवरुन दिली आहे. 

दरम्यान, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्याला मारहाण झाली होती. याविरोधात दिल्लीतील 'आयएएस' अधिकाऱ्यांनी संप पुकारला आहे, असा आरोप केजरीवाल यांनी केला आहे. हा संप मागे घेण्यासाठी राज्यपाल अनिल बैजल यांनी मध्यस्थी करावी, अशी मागणी करत केजरीवाल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सोमवारपासून नायब राज्यपालांच्या कार्यालयात धरणे आंदोलन सुरू केले आहे. 

 

टॅग्स :New Delhiनवी दिल्लीArvind Kejriwalअरविंद केजरीवाल