शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

Satpuda tiger project: सातपुडा व्याघ्र प्रकल्प अबाधित होणार, गावे इतरत्र करणार पुनर्वसित; सरकारने लागू केले होते धोरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2022 07:59 IST

Satpuda tiger project: वन्यजीवांसाठी भारतातील सर्वोत्कृष्ट वसतिस्थानपैकी एक असलेले सातपुडा व्याघ्र प्रकल्प नजीकच्या भविष्यात गावरहित होणार आहे. याच व्याघ्र प्रकल्पाचा एक भाग असलेल्या बोरी अभयारण्याच्या हद्दीतून गेल्या आठवड्यात स्थानांतरित केलेले सुपलई हे शेवटचे गाव होय.

- अभिलाष खांडेकरभोपाळ : वन्यजीवांसाठी भारतातील सर्वोत्कृष्ट वसतिस्थानपैकी एक असलेले सातपुडा व्याघ्र प्रकल्प नजीकच्या भविष्यात गावरहित होणार आहे. याच व्याघ्र प्रकल्पाचा एक भाग असलेल्या बोरी अभयारण्याच्या हद्दीतून गेल्या आठवड्यात स्थानांतरित केलेले सुपलई हे शेवटचे गाव होय.होशंगाबाद जिल्ह्यातील व्याघ्र प्रकल्पातील ५५ गावांमुळे वाघांच्या संरक्षणात अडचणी निर्माण होत आहेत. या व्याघ्र प्रकल्पात ७० वाघ आढळले असून, येथील वाघांची संख्या लवकरच वाढण्याची शक्यता आहे.

व्याघ्र प्रकल्पातील गावे इतरत्र पुनर्वसित करण्यासाठी भारत सरकारने एक धोरण लागू केले होते. अलीकडच्या भरपाई योजनेनुसार एका युनिटला (कुटुंबातील एक प्रौढ व्यक्ती) व्याघ्र प्रकल्पातून स्थानांतरित केल्यास १५ लाख रुपये मिळतात.राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण विस्थापित कुटुंबांना देशभरातील वन विभागामार्फत भरपाई देते.

सातपुडा व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रीय संचालक एल. के. कृष्णमूर्ती यांनी ‘लोकमत’ला फोनवरून सांगितले की, देशातील काही अभयारण्यांपैकी गावरहित होणारे बोरी वन्यजीव अभयारण्य एक आहे. व्याघ्र संर्वधानाच्यादृष्टीने हे मोठे यश आहे. यामुळे मनुष्य आणि प्राणी यांच्यातील संघर्ष कमी होईल.माजी क्षेत्रीय संचालक आर. पी. सिंह यांनी काही वर्षांपूर्वी इतरत्र स्थानांतरित करण्याची योजना सुरू केली होती. सुपलई गाव इतरत्र पुनर्वसित करण्याचे स्वागत केले आहे. उद्यान व्यवस्थापनातील एक मोठे यश आहे. त्यामुळे भारतातील वाघांचे संरक्षण करण्यासाठी मदत होईल. सातपुडा व्याघ्र प्रकल्प आणि संरक्षित क्षेत्रातून ८ हजार लोकांना स्थलांतरित करण्यात आले आहेत.

टॅग्स :Tigerवाघ