शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

ओवेसींच्या घोषणेवर संजय राऊतांची प्रतिक्रिया, म्हणाले "पॅलेस्टाईनचा उल्लेख करणं गुन्हा आहे का?’’

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2024 12:31 IST

Sanjay Raut News: एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेऊन झाल्यावर जय भीम, जय तेलंगाणा आणि जय पॅलेस्टाईन, अशी घोषणा दिली होती. ओवेसी यांच्या कृतीवर आक्षेप घेण्यात आला होता. त्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी मात्र असदुद्दीन ओवेसी यांचा बचाव केला आहे.

सोमवारपासून सुरू झालेल्या अठराव्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनाच्या सुरुवातीच्या दोन दिवसांमध्ये नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी झाला. या शपथविधीदरम्यान, काही घटनांमुळे वादविवादही झाले होते. त्यात एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेऊन झाल्यावर जय भीम, जय तेलंगाणा आणि जय पॅलेस्टाईन, अशी घोषणा दिली होती. ओवेसी यांच्या कृतीवर आक्षेप घेण्यात आला होता. तसेच ओवेसींचं संसद सदस्यत्व रद्द करण्याची मागणीही करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी मात्र असदुद्दीन ओवेसी यांचा बचाव केला आहे. पॅलेस्टाईनचा उल्लेख करणं हा गुन्हा आहे का? असा सवाल त्यांनी विचारला आहे.

संजय राऊत यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला असता त्यांना असदुद्दीन ओवेसी यांनी सदस्यत्वाची शपथ घेताना केलेल्या पॅलेस्टाईनच्या जयजयकाराबाबत विचारण्यात आले. त्यावेळी संजय राऊत म्हणाले की, पॅलेस्टाईनचा उल्लेख करणं हा गुन्हा आहे का? पॅलेस्टाईनच्याबाबतीत भारत सरकारचं धोरण काय आहे हे आधी स्पष्ट करा. पॅलेस्टाईन हा एक देश आहे. पॅलेस्टाईनमध्ये मानवतेचा संहार होतान आम्ही पाहतोय. मी त्यांच्या कृतीचं समर्थन करत नाही. पण अशा प्रकारचा मानवी संहार होऊ नये, अशी नरेंद्र मोदी यांचीही भूमिका आहे. पॅलेस्टाईनमधील नरसंहाराबाबत जगभरातून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे जर काही ओवेसींकडून चूक झाली असेल, तर केंद्र सरकारने कारवाई करावी. पण मी सांगतो की पॅलेस्टाईनमध्ये आजही ज्याप्रकारे नरसंहार सुरू आहे, त्यावर संपूर्ण जगाला चिंता आहे, असे संजय राऊत म्हणाले. 

दरम्यान, मंगळवारी सभागृहात शपथ घेत असताना पॅलेस्टाईनचा जयजयकार केल्याने उदभवलेल्या वादावर प्रतिक्रिया देताना असदुद्दीव ओवेसी म्हणाले की,  मी सभागृहात काहीही चुकीचे बोललो नाही. मी घटनेतील कोणत्याही तरतुदीचे उल्लंघन केलेले नाही. शपथविधीदरम्यान 'जय पॅलेस्टाईन'चा नारा दिला. पॅलेस्टाईनचा मुद्दा भारतासाठी नवीन नाही.  बरेच जण, बरेच काही बोलत आहेत. मी म्हणालो- जय भीम, जय मीम, जय तेलंगाना, जय फिलिस्तीन. हे घटनेच्या विरोधात कसे काय असेल? संविधानात अशी तरतूद दाखवा. नेहमी आपलेच खरे म्हणता येणार नाही. दुसरे काय म्हणतात हेही आपण एकदा ऐकून घ्यायला हवे. मला जे बोलायचे होते, ते मी बोललो, असा दावा ओवेसी यांनी केला. 

टॅग्स :lok sabhaलोकसभाAsaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीSanjay Rautसंजय राऊतIsrael Palestine Conflictइस्रायल पॅलेस्टाईन संघर्ष