शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

"संजय राऊत हे महाराष्ट्राचे राहुल गांधी झालेत", २ हजार कोटींच्या आरोपावर भाजपा प्रवक्त्याचं प्रत्युत्तर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2023 17:37 IST

उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या आरोपावर भाजपानं प्रत्युत्तर दिलं आहे.

नवी दिल्ली-

उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या आरोपावर भाजपानं प्रत्युत्तर दिलं आहे. शिवसेना हे नाव आणि निवडणूक चिन्ह धनुष्यबाण चोरण्यासाठी २ हजार कोटी रुपयांचा सौदा झाल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. यावर भाजपाचे नेते आणि प्रवक्ते शहजाद पुनावाला यांनी प्रत्युत्तर देताना संजय राऊत हे आता महाराष्ट्राचे राहुल गांधी बनले आहेत. त्यांच्या आरोपांना कुणीच भीक घालत नाही, असं म्हटलं आहे. 

उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून केल्या जाणाऱ्या विधानांना जनता गांभीर्यानं घेत नाही. संवैधानिक संस्थांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करुन संजय राऊत हे राहुल गांधी यांचीच भाषा बोलू लागले आहेत, असं भाजपा प्रवक्ते शहजाद पूनावाला म्हणाले. 

"राजकीय निराशा लपवायची आहे, ठाकरे कुटुंबाला वाचवायचं आहे, त्यामुळेच निवडणूक आयोगाला लक्ष्य केलं जात आहे. संजय राऊत यांनी निवडणूक आयोगावर केलेला आरोप बेताल आणि हास्यास्पद आहे. आज महाराष्ट्रात संजय राऊत, उद्धव सेना आणि त्यांच्या नेत्यांना कुणीही राजकीयदृष्ट्या गांभीर्याने घेत नाही. त्यांच्याकडे फारसे राजकीय वर्चस्व राहिलेले नाही. निवडणूक आयोगाचा आदेश तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही न्यायालयात दाद मागू शकता. मात्र संवैधानिक संस्थांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून उद्धव सेना काँग्रेस आणि राहुल गांधींसारखंच वागत आहे", असं शहजाद पूनावाला म्हणाले. 

राऊत यांच्या विधानावर पूनावाला यांनी जोरदार टीका केली. "संजय राऊत आज राहुल गांधींची भाषा बोलू लागले आहेत. निवडणूक हरल्यावर ते निवडणूक आयोगावर प्रश्न उपस्थित करतात. खटला हरल्यावर ते सर्वोच्च न्यायालयावर प्रश्न उपस्थित करतात. ते इतर संस्थांवर प्रश्न उपस्थित करतात. त्यांनी केवळ निवडणूक चिन्ह गमावलेलं नाही तर बाळासाहेब ठाकरे यांची हिंदुत्वाची विचारधाराही गमावली आहे", असं पूनावाला म्हणाले. 

संजय राऊतांनी केलाय गंभीर आरोप"धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना नाव मिळवण्यासाठी आतापर्यंत २००० कोटींचा सौदा आणि व्यवहार झाले", असं म्हणत संजय राऊत यांनी गंभीर आरोप केला आहे. बऱ्याच गोष्टी लवकरच उघड होतील असाही इशारा राऊत यांनी दिला आहे. संजय राऊत यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे.  "माझी खात्रीची माहिती आहे.... चिन्ह आणि नाव मिळवण्यासाठी आतापर्यंत 2000 कोटींचा सौदा आणि व्यवहार झाले आहेत... हा प्राथमिक आकडा आहे आणि 100 टक्के सत्य आहे.. बऱ्याच गोष्टी लवकरच उघड होतील... देशाच्या इतिहासात असे कधीच घडले नव्हते..." असं राऊत यांनी म्हटलं आहे.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीSanjay Rautसंजय राऊत